Rape Case: उत्तर प्रदेशातील हरदोई येथे पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांनीही आठवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुण आयटीआय आणि डी फार्माचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. आरोपी तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने विद्यार्थिनीला बोलावलं आणि तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केलं.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे वय 12 वर्षे आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी पीडितेला चॉकलेट देऊन आपली ओळख करून दिली. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी, ती शाळेतून परतत असताना दोघेही म्हणाले, “चल तुझा वाढदिवस साजरा करूया.” अल्पवयीन पीडिता सुद्धा आरोपी तरुणांच्या बोलण्यात आली.
12 वर्षीय मुलीवर बलात्कार
सामूहिक बलात्काराची ही खळबळजनक घटना कोतवाली शहर परिसरातील आहे. येथे एका इंटर कॉलेजच्या आठवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी कोतवाली हरपालपूर परिसरातील पलिया पूर्वा गावातील रहिवासी रुस्तम यादव आणि प्रियांशु या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यापैकी 21 वर्षीय रुस्तम हा आयटीआयचा विद्यार्थी आहे आणि 19 वर्षीय प्रियांशु हा डी फार्माचा विद्यार्थी आहे. दोघांनीही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन तिच्याशी ओळख करून घेतली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या जागी आता मुंबईतील पहिलं डेबल डेकर रेल्वे ब्रिज...
पार्टीच्या बहाण्याने मित्राच्या घरी नेलं अन्...
दोघेही बऱ्याचदा मुलीला चॉकलेट द्यायचे, त्यामुळे मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवू लागली. 30 ऑगस्ट रोजी, मुलगी तिच्या वाढदिवशी शाळेतून परतत असताना, त्या दोघांनी तिला वाटेत थांबवलं. त्यानंतर तिला चॉकलेट दिलं आणि वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने काही अंतरावर त्यांच्या मित्राच्या घरी तिला घेऊन गेले. तिथे दोघांनीही तिच्यावर बळजबरी केली. मुलीने विरोध असता दोघांनीही तिला धमकावलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.
हे ही वाचा: “घरजावई हो नाहीतर...” होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...
जर याबद्दल कोणालाही सांगितलं तर तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या मुलीच्या वागण्यात बदल पाहून कुटुंबीयांनी चौकशी केली आणि विद्यार्थिनीने त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केली आहे आणि तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू आहे.
ADVERTISEMENT
