Delhi Crime : एका 32 वर्षीय स्पीच थेरपिस्टने 6 वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचा धक्कादायक आरोप आहे. पीडित तरुणी बोलू शकत नसल्याने तिला काही सांगता येत नाही. संबंधित घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळताच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 32 वर्षीय स्पीच थेरपिस्टला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. ही घटना दिल्लीतील रोहिणी परिसरात घडल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात स्पीट थेरपिस्टवर पोक्सोअंतर्गत अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या घटनेची माहिती 7 सप्टेंबर रोजी मिळाली. थेरपी क्लासमधून परतत असताना मुलीच्या मुलीच्या तक्रारदार आईने तिच्या मुलीच्या असामान्य वर्तनावर संशय व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण आता उघडकीस आलं.
पोलिसांनी सांगितलं की, मुलीला बोलण्यास त्रास व्हायचा. त्यामुळे 19 ऑगस्टपासून ती या सेंटरमध्ये 45 मिनिटं सेशनमध्ये सहभागी झाली होती. 6 सप्टेंबर रोजी मुलगी वर्गातून परतली तेव्हा तिने आपल्यासबत घडलेला प्रकार हे कृतीतून सांगितला, त्यानंतर पीडितेची आई भयभीत झाली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, मुलीच्या तिच्या आरोपी थेरपिस्टचे नाव सांगितले. नंतर सरकारी रुग्णालयात तिच्या गुप्तांगाला आणि छातीला अयोग्यरित्या स्पर्ष केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : नवरा बाहेर गेला अन् पत्नी दुसऱ्यासोबत बेडरूममध्येच... पतीने रंगेहाथ पकडलं, नंतर गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली धिंड
दरम्यान, दिल्लीत महिला, मुलींच्या असुरक्षितेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईच्या तुलनेत दिल्लीत मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. निर्भयासारख्या प्रकरणाने एकेकाळी देश हादरून गेला होता. मात्र, या प्रकरणाच्या काही वर्षानंतर महिलांवरील, मुलींवरील अन्याय अत्याचार थांबताना दिसत नाहीत.
ADVERTISEMENT
