Mumbai Shocking Viral News : मुंबईत एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. येथील दोन अल्पवयीन व्यक्तींच्या समलैंगिक संबंधांने हत्येचं स्वरुप धारण केलं. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षीय आरोपीवर त्याच्या 16 वर्षीय पार्टनरच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. कोल्ड ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत घडला मोठा हत्याकांड, त्या मुलासोबत काय घडलं?
रिपोर्टनुसार, पोलीस याप्रकरणाची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक रोपोर्टची वाट पाहत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांच्या अल्पवयीन मुलगा 29 जूनला घराबाहेर पडला होता. जेव्हा तो त्या रात्री परतला नाही, तेव्हा त्याचा शोध सुरू केला.
दुसऱ्या दिवशी पीडित मुलाच्या एका मित्राने त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली की, एक दिवस आधी तो आरोपीच्या घरी गेला होता. जेव्हा पीडित मुलाचे कुटुंबीय आरोपीच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलगा बेडवर आरोपीच्या जवळ बसलेला पाहिला. जेव्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. तेव्हा एका डॉक्टरला बोलावण्यात आलं. त्यानंतर पुष्टी करण्यात आली की, त्या मुलाचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा >> वडील आणि भावाचा मृत्यू, आता बहिणीलाही.. टीम इंडियाच्या आकाश दीपची कहाणी वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल!
वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
तपासादरम्यान उघडकीस आलं की, आरोपीने पीडितेला कोल्ड ड्रिंक्स प्यायला दिली होती. त्यानंतर त्याला उलटी झाली आणि नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट येणं बाकी आहे. पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपी जवळपास चार महिन्याआधी पीडिताला नागपूरमध्ये घेऊन गेला होता. त्याचा कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.
हे ही वाचा >> मुलगी आणि आईचे होते अनैतिक संबंध, शारीरिक संबंधासाठी चटावलेल्या दोघींनी केलं भयंकर कृत्य
रिपोर्टनुसार, जेव्हा तो अल्पवयीन मुलगा परत आला होता. तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याला आरोपीपासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर पीडित मुलाने आरोपीला भेटणं बंद केलं होतं. पोलिसांना संशय आहे की, याच गोष्टीला वैतागून आरोपीने हत्येचा कट रचला. पीडित मुलाला त्याच्या घरी बोलावलं आणि बिषारी कोल्ड्रिंक्स दिली.
ADVERTISEMENT
