फडणवीसांना संपवण्याची धमकी, सावंतला ठोकल्या बेड्या, कोण आहे योगेश सावंत?

देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारी पोस्ट शेअर केल्या प्रकरणी योगेश सावंतला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

मुंबई तक

• 07:21 PM • 29 Feb 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस धमकीप्रकरणी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणारी पोस्ट आणि अपमानस्पद भाषा वापरल्याप्रकरणी योगेश सावंतला (Yogesh Sawant) मुंबईतील सांताक्रूज पोलिसांनी अटक केली आहे. योगेश सावंतला नवी मुंबईतून ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, त्यानंतर त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

यूट्यूबवर मुलाखती चालू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणीच पोलिसांनी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.

व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की गावरान विश्लेषक या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्याच बरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. त्यामुळे आता योगेश सावंतवर कारवाई केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या युवा शाखेचे शहर पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांनी मंगळवारी सायंकाळी सांताक्रूझ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. एका यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित केलेल्या मुलाखतीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती, व जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी आता गुन्हा दााखल करण्यात आला आहे. 

आरोपीच्या आवळल्या मुसक्या

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या धमकी प्रकरणी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 153(A), 500, 505(3), 506(2), आणि 34 अन्वये गुन्‍हा योगेश सावंतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
फेसबुक युजर योगेश सावंतला व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी आरोपी केल्याचे सांगत  या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचा शोध पोलीस घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

    follow whatsapp