Pune : महिला रिलस्टारने आधी प्रियकराचे हात-पाय बांधले, नंतर केलं विचित्र कृत्य...

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 10:12 PM)

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध महिला रिल्स स्टारने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाल्याने ही घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असून मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

pune crime news

pune crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिला रिल्स स्टारने प्रियकराची केली हत्या

point

पोलिसांनी संशयित महिला संध्या पवारला घेतलं ताब्यात

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध महिला रिल्स स्टारने प्रियकराची हत्या केली. या घटनेचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाल्याने महिलेनं तरुणाची हत्या केली. मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी संशयित महिला संध्या पवारला ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

संध्या पवारचं वय वर्षे 30 असून प्रेमसंबंधातून त्यांच्यात  वाद झाला. अशावेळी तरुणाचे हातपाय बांधले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अमानुषपणे मारहाण करत खून करण्यात आला. दरम्यान ही घटना 12 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

हत्येत मृत पावलेल्या तरुणाचे नाव कमल रामदयाल मधुकर वय वर्षे 30, मूळ राहणार छत्तीसगड, अशी ओळख आहे. या प्रकरणी कमलच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संध्या पवारच्या विरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि संध्या पवारचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कमल हा गुरूवारी 12 जून रोजी रात्री आपल्या प्रेयसीच्या घरी गेला असता, दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळे दोघेही संतप्त झाले, अशावेळी महिलेनं कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला. या घटनेनं इंदोरी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई

संबंधित प्रकरणात पोलिसांनी संध्या पवारला ताब्यात घेत तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा सखोल तपास एमआयडीसी पोलीस करत असून, पुढील खुलासे लवकरच होतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.