Pune Rape Case : राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात दररोज अत्याचाराच्या घटना घडतात. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अशीच घटना पुण्यातील कोंढवामध्ये घडली आहे. एका युवकाने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वच्छतागृहात लैंगिक शोषण केलं आहे. या घटनेनं कोंढवा हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT
ही घटना कोंढवामधील एका स्वच्छतागृहात घडली आहे. हे स्वच्छतागृह पीडितेच्या घरासमोर असल्याचं सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीवर एका युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेनं कोंढवात हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केल आहे.
हेही वाचा : चौथ्या बायकोचा खून करून नवऱ्याने बेडरूममध्ये केलं धक्कादायक कृत्य! लोकांनी केला घटनेचा पर्दाफाश
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही कोढवातील घटनास्थळी परिसरात राहतात. ही घटना 3 मे 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घटना घडली होती. पीडित मुलगी स्वच्छतागृहात गेली असताना काही लोकांनी दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा घडलेला प्रसंग कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती.
हेही वाचा : भांड्याला भांडं कधीच लागणार नाही! महिला त्यांच्या पतीला धोका का देतात? 'ही' कारणे एकदा वाचाच
या घडलेल्या घटनेनंतर पीडित युवती ही घरी गेली. त्यानंतर पीडितेचं पोट दुखू लागल्यानं तिला असहय्य वेदना होऊ लागल्या होत्या. पीडितेनं आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. त्यानंतर पीडितेच्या आईने तिचे कपडे काढून पाहिलं असता तिच्या आईने पोलिस ठाणे गाठत संबंधित प्रकरणाविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात आरोपीविरूद्घ तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीण आणि शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
ADVERTISEMENT
