Today Viral News : मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येचं प्रकरण लपवण्यासाठी आरोपीने मोठा प्लॅन केला होता. परंतु, स्थानिक लोकांनी या हत्याप्रकरणाचा पर्दाफाश केला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यप्रदेशच्या बडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुलगाव येथे घडल्याचं बोललं जात आहे. 45 वर्षांच्या लक्ष्मणने त्याची चौथी पत्नी रुक्मीणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह त्याच्या रुममधील बेडखाली ठेवला. हत्या केल्यानंतर लक्ष्मण अनेक दिवस त्याच बेडरूममध्ये झोपला. जिथे त्याने त्याच्या पत्नीचा मृतदेह लपवला होता.
दोघेही दारू प्यायचे आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आणि रुक्मीणी दोघांनाही दारूचं व्यसन लागलं होतं. त्या दोघांमध्ये नेहमीच वादविवाद होत होते. दोघांचंही सहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लक्ष्मणचं हे चौथं लग्न होतं आणि रुक्मीणीचं तिसरं..दोघांची मुलं त्यांच्यासोबत राहत नव्हती.
हे ही वाचा >> भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवलं, 23 वर्षीय कुणाल जागीच ठार, एक जण जखमी; कारमध्ये कोण कोण होतं?
पोलिसांना मिळाला लक्ष्मणच्या पत्नीचा मृतदेह
पोलीस जेव्हा लक्ष्मणच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी रुममध्ये तपास सुरु केला तेव्हा त्यांना रुममध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर लक्ष्मणने शेजारच्या लोकांना खोटी माहिती दिली. पत्नी नातेवाईकांच्या घरी गेलीय, असं लक्ष्मणने लोकांना सांगितलं आणि त्याने घर बंद करून ठेवलं.
हत्या केल्यानंतर लक्ष्मण गावाला पळून गेला
पत्नीची हत्या झाल्यानंतर लक्ष्मण गावाला निघून गेला. रुक्मीणी विष प्यायली आहे, असं त्याने गावकऱ्यांना सांगितलं. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. परंतु, पोलिस घटनास्थळी पोहोचण्याआधीच लक्ष्मणने रुक्मीणीचा खून केला होता.
हे ही वाचा >> तरुण सीमा हैदरच्या घरात घुसला अन् झाला मोठा कांड, पोलिसांना म्हणाला, "माझ्यावर काळी जादू..."
ADVERTISEMENT
