धक्कादायक! लेखक राजन खान यांच्या मुलाची पुण्यात आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले कारण

मुंबई तक

03 Oct 2023 (अपडेटेड: 03 Oct 2023, 07:16 AM)

मराठी साहित्यातील लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहून त्यामध्ये कांहीची नावं लिहिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Pune senior writer Rajan Khan son, an it engineer suicide police said that he committed suicide due to financial reasons pune crime news

Pune senior writer Rajan Khan son, an it engineer suicide police said that he committed suicide due to financial reasons pune crime news

follow google news

Pune Suicide: मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक राजन खान (Writer Rajan Khan) यांच्या आयटी अभियंता मुलाने आत्महत्या (Suicide) केल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यातील सोमटने फाटा (Somatane phata ) येथे ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्या केलेल्या राजन खान यांच्या मुलाचे डेबू खान (Debu Khan) असं त्याचे नाव आहे.

हे वाचलं का?

उच्च शिक्षित डेबू

डेबू राजन खान याने वयाच्या 28 व्या वर्षी गळफास घेत आपलं आयुष्य संपवले. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आला आहे. लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू नुकताच त्याने अभियंता क्षेत्रातील पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर तो तो सोमटने फाटा इथं एकटाच राहत होता. मात्र सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही. हे पाहून दुपारी घरमालकांनी डेबूच्या भावाबरोबर संपर्क साधला.

हे ही वाचा >> Nanded : आधी ठाण्यात, आता नांदेडला ‘मिंधे सरकार’…,नांदेड मृत्यू प्रकरणात ठाकरेंचा संताप

भावाची डेबूच्या घरी धाव

डेबू खान यान दिवसभर घराचे दार उघडले नसल्याने घरमालकाच्या घरातून त्याच्या डेबूच्या भावाला फोन करण्यात आला. त्यांनी फोन केल्यानंतर भावाने डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो न झाल्याने पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमटने फाट्यावरील त्याच्या घराकडे तो गेला. त्यावेळी त्याने दार ठोठवले मात्र त्याला डेबूकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

पोलिसांनी दार तोडले

डेबूच्या भावाने त्याच्या घराचे दार ठोठावूनही त्याने कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्याने थेट तळेगाव पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलवले. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आले.

हे ही वाचा >> Buldhana : खामगावात गजानन महाराज प्रगटले? तोतया की बहुरूपी…भक्तांची दर्शनासाठी गर्दी

चिठ्ठीत आत्महत्येचं कारण

आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली असून त्यामध्ये त्याने आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं अन त्यातून फटका बसल्याचा उल्लेख केला आहे. तसेच ज्यांच्याशी पैश्यांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावं ही त्या चिठ्ठीत नमूद केली आहेत. त्याच आधारावर तळेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यानंतर डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    follow whatsapp