निवृत्त सैनिकाची दुसरं लग्न करण्याची इच्छा, मुलाने विरोध करताच घडलं भयानक; कुणाचा झाला शेवट?

एका 66 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी हवलदाराने आपल्या पोटच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून वडिलांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

12 May 2026 (अपडेटेड: 12 May 2026, 12:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वडिलांची दुसरं लग्न करण्याची इच्छा

point

मुलाने विरोध करताच घडलं भयानक

point

कुणाचा झाला शेवट?

Crime News : एका 66 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी हवलदाराने आपल्या पोटच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून वडिलांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून बाप-लेकाच्या या वादाचा करुण अंत झाला आहे. पंजाबच्या न्यू अगर नगर परिसरातील ही बातमी आहे. ही हत्या नेमकी का झाली, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरिंदर सिंह यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते एका महिलेच्या संपर्कात होते आणि तिच्याशी विवाह करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांचा 38 वर्षीय मुलगा गुरशरण सिंह याला हे मान्य नव्हते आणि त्याने या लग्नाला कडाडून विरोध केला होता. वडिलांच्या प्रेमसंबंधांमुळे घरात वारंवार भांडणे होत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.

हे ही वाचा : 'दारू प्यायल्यावर जे मनात येईल ते करतो..' माजी सैनिकाने 26 तासात केल्या तीन हत्या; नेमकं प्रकरण काय?

पाठलाग करत झाडल्या गोळ्या

रविवारी (10 मे) रात्री याच मुद्द्यावरून पिता-पुत्रात पुन्हा जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. संतापलेल्या सुरिंदर सिंह यांनी आपली परवानाधारक बंदूक बाहेर काढली. वडिलांच्या हातात बंदूक पाहून गुरशरण जिवाच्या आकांताने घराबाहेर पळाला, मात्र सुरिंदर यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने गुरशरणचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सुरिंदर सिंह यांनी घरी परतत विष प्राशन केले. यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : बीड : भोळसर मुलीवर चुलत भावाचा अत्याचार, बापाला अटक, डॉक्टरचा बीपी वाढला!

परदेशातील मुलींना धक्का

पोलिसांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले असून दोघांचेही मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गुरशरण अविवाहित होता, तर त्याच्या दोन बहिणी इंग्लंड आणि कॅनडामध्ये स्थायिक आहेत. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर सुरिंदर सिंह एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.