Crime News: दाजी आणि मेहुणीच्या नात्यात बऱ्याच मजेशीर बाबी घडत असल्याचं आपण सर्वच पाहतो. अनेकदा दोघांना मस्करीत चिडवलं देखील जातं. मात्र, काहीजण या नात्याचा वेगळाच अर्थ काढतात आणि अशात भलतंच काहीतरी घडून बसतं. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे दाजी आणि मेहुणीने नात्यातील सर्व मर्यादाच ओलांडल्या आणि दोघेही एकमेकांसोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
संबंधित प्रकरण बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. येथे दाजी आणि मेहुणी एकाच दिवशी घरातून फरार झाले. इतकेच नव्हे तर, आरोपी महिला आपल्या घरातून पैसे आणि दागिने सुद्धा सोबत घेऊन गेली. आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपी महिला ही विवाहित असून तिच्या पतीला याबद्दल कळताच तो जोरजोरात रडू लागला. त्यावेळी, त्याने आपल्या पत्नीला बऱ्याच ठिकाणी जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण, ती कुठेच सापडली नाही.
हे ही वाचा: India Today Conclave Mumbai 2025: समजून घेऊया नवं वास्तव!
पतीने थेट पोलिसात धाव घेतली
यानंतर, पीडित पतीने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्यावेळी त्याने तक्रार करताना सांगितलं की, "साहेब, माझी पत्नी मला सोडून तिच्या दाजीसोबत पळून गेली. घरातून पळून जाताना ती आपल्यासोबत घरातील सर्व पैसे आणि दागिने सुद्धा घेऊन गेली. माझ्या पत्नीचा लवकरात लवकर शोध घ्या. समाजात मला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटतेय." पोलिसांनी पीडित पतीच्या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांना खबऱ्यांकडून दोघांचं लोकेशन कळलं. त्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही अटक करून पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. त्यावेळी, पतीलाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. समुपदेशनानंतर पत्नीला तिच्या पतीकडे परत करण्यात आले.
हे ही वाचा: राज्याला पावसानं झोडपलं, कोकणासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची उडाली दाणादाण, आजची हवामान परिस्थिती वाचा
रोख रक्कम आणि दागिने घेऊन गेली...
संबंधित घटना भभुआ शहरातील एका गावात घडल्याचं सांगितलं जात आहे. एका व्यक्तीने त्याची पत्नी तिच्या दाजीसोबत पळून गेल्याची पोलिसांत तक्रार केली होती. तिने घरातून एक लाख रुपये रोख आणि दोन लाख रुपयांचे दागिनेही नेल्याचा पतीने आरोप केला. पीडित पतीने तक्रार करताना सांगितलं की, "माझा मेहुणा मोहनिया गावाचा रहिवासी असून त्याच्यासोबत माझी पत्नी पळून गेली आहे." आरोपी पत्नी रात्रीच तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याने याबद्दल कोणाला काहीच कळलं नाही. सकाळी, महिला घरात नसल्याचं कळताच कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण, बऱ्याच प्रयत्नानंतर देखील ती सापडली नाही. त्यानंतर, संबंधित महिला तिच्या दाजीसोबत पळून गेल्याचं समोर आलं. पोलिसांनी आधी पीडित पती आणि त्याच्या पत्नीच्या सर्व नातेवाईकांची चौकशी केली. नंतर, गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
