Crime News: घरात कोणीच नसताना दोन भावांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादात एकमेकांना झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याचं धक्कदायक वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात घडली. येथील टेटिया बंबरच्या खपडा गावातील रहिवासी असलेल्या दोन सक्ख्या भावांमध्ये मंगळवारी सकाळी मोठं भांडण झालं आणि या भांडणात दोघांनी एकमेकांवर धाकदार शस्त्राने वार केला. दरम्यान, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: पत्नीचा शहरातच राहण्याचा हट्ट... रागाच्या भरात पतीने गळा दाबून संपवलं! कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना
एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
शैलेश कुमार आणि मुकेश कुमार अशी मृतांची ओळख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांमधील मारहाणीदरम्यान शैलेशचा जागीच मृत्यू झाला असून मुकेशला उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आलं. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसुद्धा दाखल झाली असून पुरावे गोळा केले जात आहेत.
हे ही वाचा: सिंधुदुर्ग: आई भाजी विकत असताना मुलगा CRPF मध्ये निवड झाल्याची बातमी घेऊन आला, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ
मृतांचे नातेवाईक आणि स्थानिकांची चौकशी करून पोलीस माहिती मिळवत आहेत. मात्र, दोन्ही भावांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरून वाद झाला? हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांच्या तपासनंतरच, हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (20 जानेवारी) सकाळच्या सुमारास दोन्ही भावांमध्ये मोठा वाद झाला. घटनेच्या वेळी, कुटुंबातील दुसरं कोणीही उपस्थित नव्हतं.
ADVERTISEMENT











