पत्नीचा शहरातच राहण्याचा हट्ट... रागाच्या भरात पतीने गळा दाबून संपवलं! कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना
पत्नीला सासरच्या लोकांसोबत गावी राहायचं नव्हतं आणि म्हणून ती तिच्या पतीकडे शहरातच राहण्याचा हट्ट करत होती. याच वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीचा शहरातच राहण्याचा हट्ट...
रागाच्या भरात पतीने गळा दाबून संपवलं!
कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना
Crime News: मध्य प्रदेशातील भोपाल येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील छोला पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची हत्या केल्याचं वृत्त आहे. बऱ्याच काळापासून पीडित पत्नी आणि आरोपी पतीमध्ये वाद सुरू होते.
पत्नी आणि पतीमध्ये सतत वाद
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेला तिच्या सासरच्या लोकांपासून गावी राहायचं नव्हतं आणि त्यामुळे ती पतीकडे भोपालमध्येच कायमचं राहण्याचा हट्ट करत होती. याच कारणामुळे पीडित पत्नी आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी देखील याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं. दरम्यान, रागाच्या भरात आरोपी पती हेमराजने आपल्या पत्नीचा गळा दाबला आणि यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: सिंधुदुर्ग: आई भाजी विकत असताना मुलगा CRPF मध्ये निवड झाल्याची बातमी घेऊन आला, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ
संबंधित घटनेनंतर, आरोपी पतीने स्वत: पीडितेच्या नातेवाईकांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. त्वरीत पोलिसांपर्यंत सुद्धा या घटनेची माहिती पोहोचली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
हे ही वाचा: 14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार... मित्राने बदला घेण्याचं ठरवलं अन्... शिक्षकासोबत घडलं भयंकर!
पोलिसांनी दिली माहिती...
आता, पोलिसांनी आरोपी पती हेमराजला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 महिन्यांपूर्वीच दोघांचा एकमेकांसोबत विवाह झाला असून त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं. तसेच, आरोपी पती हा भाजीविक्रेता म्हणून काम करत होता. सध्या, पोलिसांनी पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून रिपोर्ट्स आल्यानंतर, या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती आहे.










