चॉकलेट समजून सापालाच खाल्लं, नंतर 3 वर्षाच्या चिमुकल्याला…

मुंबई तक

• 02:39 PM • 05 Jun 2023

एका चिमुकल्याने खेळता खेळता चॉकलेट (Chocolate) समजून सापाला चावून खाल्ल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती कुटुंबियांनी मिळताच त्यांनी तत्काळ चिमुकल्यासह सापाला (Snake) घेऊन रूग्णालयात धाव घेतली होती. हा घटनाक्रम पाहुन डॉक्टरांना (Doctor) देखील धक्का बसला होता.

three year old child chewed snake thinking it was chocolate shocking story from uttar pradesh

three year old child chewed snake thinking it was chocolate shocking story from uttar pradesh

follow google news

माणसाला साप चावला तर त्याचा मृत्यू होतो. पण माणसाने सापाला चावले तर का? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर या बातमीत आहे. या घटनेत एका चिमुकल्याने खेळता खेळता चॉकलेट (Chocolate) समजून सापाला चावून खाल्ल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती कुटुंबियांनी मिळताच त्यांनी तत्काळ चिमुकल्यासह सापाला (Snake) घेऊन रूग्णालयात धाव घेतली होती. हा घटनाक्रम पाहुन डॉक्टरांना (Doctor) देखील धक्का बसला होता. या घटनेची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. (three year old child chewed snake thinking it was chocolate shocking story from uttar pradesh)

हे वाचलं का?

मोहम्मदाबादच्चा मदनापुर गावात दिनेश कुमार त्याच्या कुटुंबासोबत राहतात. दिनेश कुमार यांना अक्षय नावाचा तीन वर्षाचा मुलगा आहे. हा अक्षय त्याच्या घराबाहेर खेळत होता. या दरम्यान नजीकच्याच झाडीतून एक साप (Snake) त्याच्याजवळ आला होता.यावेळी खेळता खेळता अक्षयने सापाला तोंडात धरून चॉकलेटप्रमाणे चोखायला आणि चावायला सुरूवात केली. चिमुकल्याच्या या कृतीमुळे सापाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना चिमुकल्याच्या आजीने पाहत आरडाओऱड करण्यास सुरुवात केली. आणि चिमुकल्या अक्षय जवळ जाऊन त्याच्या हातातला साप दुर फेकला.

हे ही वाचा : मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…

या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी नजीकच्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात चिमुकल्याला नेले. चिमुकल्यासोबत सापाला देखील घेऊन ते रूग्णालयात पोहोचले होते. डॉक्टरांनी तत्काळ चिमुकल्या अक्षयची तपासणी केली.या तपासणीत त्यांना त्याची प्रकृती ठिक वाटली. यानंतर डॉक्टरांनी तरूणाला प्राथमिक उपचार देत घरी पाठवले होता. ही घटना एकूण डॉक्टरांसह संपूर्ण गाव चकीत झाले होते.

अक्षयची आजी सुनीता या घटनेवर सांगते की, अक्षय घराच्या बाहेरच खेळच होता. तेव्हा त्याच्याजवळ साप आला होता. चिमुकल्याने सापाला हातात पकडून चावले. हे दृष्य पाहून कुटुंबिय हादरले आणि त्यांनी तत्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी चिमुकल्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली तर सापाचा मृत्यू झाल्याचे देखील सांगितले. हा घटनाक्रम एकूण सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान अशा घटनेत चिमुकल्यासोबत बर वाईट होण्याची मोठी शक्यता होती.त्यामुळे कुटुबियांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलं खेळताना कोणते अपघात घडणार नाहीत, कोणतीही वस्तु खाणार नाहीत, याची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

    follow whatsapp