Crime News : एका तरुणीवर तिच्याच मित्राने अन्य साथीदारांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे, तर अन्य सहा जणांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना कुठे आणि कशी घडली?
ही संतापजनक घटना बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील करनामेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 5 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी ही आरोपी उपेंद्र यादव उर्फ लल्लू यादव याची ओळखीची होती. उपेंद्रने तिला भेटण्यासाठी आपल्या 'संइया के डेरा' या गावी बोलावले होते. आपल्या मित्रावर विश्वास ठेवून ही तरुणी त्याला भेटायला गेली होती, मात्र तिथे तिच्यासोबत जे घडले त्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी गावात पोहोचल्यानंतर उपेंद्र आणि त्याच्या इतर नऊ साथीदारांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या अमानवीय कृत्यानंतर तरुणीची प्रकृती खालावली. नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर तिने कसाबसा आपला घरचा रस्ता गाठला आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिच्या भावाने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
हेही वाचा : Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? शेवटी दोन्ही तरुणींचा मृतदेह मंदिराजवळच्या बाथरुममध्ये आढळला
10 जणांवर गुन्हा, चौघांना अटक
पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. यामध्ये उपेंद्र यादव, विनोद यादव, अवधेश यादव आणि नितीश यादव या चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघेही 'संइया के डेरा' गावचे रहिवासी आहेत. फरार असलेल्या सहा आरोपींमध्ये उत्तर प्रदेशातील दोन आणि आरा मुफसिल भागातील एकाचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक राज यांनी सांगितले की, "घटनेचे गांभीर्य ओळखून विशेष पथक तयार करण्यात आले असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल."
महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबत नसतानाच मुजफ्फरपूरमध्येही एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. मोतीझील पांडे गल्ली परिसरात कॉलेजमधून प्रवेश घेऊन भावासोबत परतणाऱ्या एका विद्यार्थिनीची एका रोडरोमिओने छेड काढली. मात्र, यावेळी विद्यार्थिनी आणि तिच्या भावाने न घाबरता धाडस दाखवले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्या तरुणाला जाब विचारला आणि त्याला पकडून ठेवले. संतप्त जमावाने आरोपीची चांगलीच धुलाई केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. भोजपूर प्रकरणातील पीडितेची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा 'फास्ट ट्रॅक' कोर्टात खटला चालवण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : अपघातानंतर मुलगा ब्रेन डेड झाला, बापाचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय, अनेकांना देणार जीवनदान!
ADVERTISEMENT











