पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक" पण दुसऱ्या बायकोच्या नादात भलतंच घडलं...

दुसरं लग्न करण्यावरून दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं की दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. नेमकी घटना काय?

दुसरं लग्न करण्याच्या कारणावरून झाला मोठा वाद अन्...

दुसरं लग्न करण्याच्या कारणावरून झाला मोठा वाद अन्...

मुंबई तक

• 08:00 AM • 10 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीला कंटाळला, मित्र म्हणाला, "दुसरं लग्न करून टाक.."

point

दुसऱ्यासाठी पत्नीसाठी 60,000 ट्रान्सफर केले...

point

पैसे ट्रान्सफर करून सुद्धा मिळाली नाही, नंतर घडलं...

Crime News: दिल्लीतील रोहिणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दुसरं लग्न करण्यावरून दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं की दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. नेमकी घटना काय? 

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 7 ऑक्टोबर रोजी रात्री रिठाला बस स्टँडजवळ बसली. प्रकरणातील पीडित तरुणाचं नाव जगदीश असून त्याचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, त्याच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी होत्या. पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. याच कारणामुळे, जगदीशने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडून येण्याचा निर्णय घेतला. तो 6 ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या घरी सोडून पुन्हा 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीला परत आला. 

मुलगी शोधण्यासाठी 60 हजार रुपये दिले...

घरी परतल्यानंतर, पीडित तरुणाने त्याच्या मित्राला आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितलं. आनंदी जीवनासाठी त्याची दुसरं लग्न करण्याची इच्छा असल्याचं त्याने त्याच्या मित्राला सांगितलं. त्यावेळी तरुणाचा मित्र दीपकने त्याच्यासाठी चांगली मुलगी बघणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्याच्या या कामासाठी दीपकने आपल्या मित्राकडून पैसे मागितले. पीडित जगदीशने लग्नासाठी चांगल्या मुलगी मिळणार या आनंदात आपल्या मित्राला 30 हजार रुपये दिले आणि 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळी आणकी 30 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. एकूण 60 हजार रुपये दिल्यानंतर, जगदीश लग्नासाठी चांगली मुलगी मिळणार या आशेत होता. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: भारतातील पहिलं मँग्रोव्ह पार्क लवकरच खुलं होणार! मुंबईतील गोराईसह 'या' भागात सुद्धा होणार निर्मिती...

चाकूने मित्रावर हल्ला 

मात्र, त्या दिवशी संध्याकाळी जवळपास 11 वाजताच्या सुमारास दीपकने जगदीशला रिठाला बस स्टँडजवळ बोलवलं. जगदीश तिथे पोहोचला आणि त्याने आपल्या मित्राला मुलीबद्दल विचारलं. त्यानंतर, आरोपी दीपक यावर प्रचंड संतापला. दरम्यान, दीपकने रागाच्या भरात चाकू बाहेर काढला आणि आपल्या मित्राच्या छातीवर वार केला. हल्ल्यानंतर, जगदीशने आपला छातीत रुतलेला चाकू बाहेर काढला आणि त्याच चाकूने दीपकवर हल्ला केला. दरम्यान, दीपक जखमी झाला आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. 

हे ही वाचा: "गोळ्या देऊन किंवा औषधे देऊन घातपात..." हत्येच्या कटाबाबत मनोज जरांगेंनी थेट घेतलं धनंजय मुंडेंचं नाव!

आरोपींवर गुन्हा दाखल 

या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि गंभीररित्या जखमी झालेल्या जगदीशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी दीपकवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 109 (1) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, जगदीशवर सुद्धा धोकादायक शस्त्राने जखम पोहोचवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला 10 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp