पत्नीचं प्रियकरासोबत लावून देणार लग्न.. पती म्हणाला, "आम्ही तिघे एकत्र राहू अन्..." विवाहबाह्य संबंधाचं भलतंच प्रकरण

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळताच त्या तरुणाने पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवलं आणि दोघांनाही लग्न करण्यास सांगितलं. इतकेच नव्हे तर, आपण तिघे एकत्र खूश राहू, असं तो तरुण पत्नीला म्हणाला.

Wife will get married to her lover Husband said We three will live happily together Shocking case of extramarital affair

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक

मुंबई तक

• 06:33 AM • 10 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देणार..

point

विवाहबाह्य संबंधाचं धक्कादायक प्रकरण

Crime News: एका तरुणाने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळताच चकित करणारं कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, या प्रकरणाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. संबंधित तरुणाचं 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर त्याच्या पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. परंतु, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळताच त्या तरुणाने पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवलं आणि दोघांनाही लग्न करण्यास सांगितलं. इतकेच नव्हे तर, आपण तिघे एकत्र खूश राहू, असं तो तरुण पत्नीला म्हणाला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देणार...

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मेरठमधील असल्याची माहिती आहे. संबंधित तरुणाने पोलीस स्टेशन अॅप्लिकेशन केलं आणि म्हणाला की, तो त्याच्या पत्नीचं लग्न स्वतःच्या मर्जीने तिच्या प्रियकराशी करू इच्छितो आणि यावर तो आनंदी असून त्याचं संपूर्ण कुटुंब सुद्धा याच्याशी सहमत आहे. तसेच, भविष्यात त्याच्या पत्नी आणि प्रियकराला त्रास देणार नसल्याचं देखील त्याने अॅप्लिकेशनमध्ये सांगितलं. जर, पत्नी किंवा प्रियकराला त्याच्याकडून त्रास झाला तर पोलीस यावर कायदेशीर कारवाई करू शकत असल्याचं त्याने म्हटलं. तरुणाच्या या निवेदनामुळे पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. 

पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध 

संबंधित तरुणाने पोलिसांना सांगितलं की, 15 वर्षांपूर्वी त्याचं लग्न प्रयागराजमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत झालं होतं. दोघांच्याही वयामध्ये जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर दोघांना तीन मुलं देखील झाली. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल संबंधित तरुणाने सांगितलं की, त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणासोबत त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. कालांतराने दोघांमध्ये जवळीकता वाढत गेली. 

हे ही वाचा: 'हा' आहे इंदूरीकर महाराजांचा होणारा जावई, नेमका काय आहे बिझनेस?

पतीचा धक्कादायक निर्णय 

त्यानंतर, संबंधित तरुणाला जवळपास 6 वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली. याबाबत, त्याने पत्नीला जाब विचारला असता तिने सांगितलं की ती तिच्या प्रियकराला सोडून अजिबात राहू शकत नाही आणि तिला तिच्या प्रियकरासोबतच लग्न करायचं आहे. सुरूवातीला, पतीने आपल्या पत्नीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण, तिने आपल्या पतीचं अजिबात ऐकलं नाही. शेवटी, पतीने आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. 

पतीने पुढे सांगितलं की, माझ्या पत्नीला सुद्धा मी तिच्यासोबत एकाच घरात राहावं, असं वाटत आहे. त्यामुळे, मी सुद्धा या घरात राहीन, पण मी दुसरं लग्न करणार नाही. आता मी माझ्या पत्नीच्या आठवणींमध्येच जगेन. त्यांचा संसार थाटण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करत आहे. मी फक्त त्यांच्यासाठी हे करूच शकतो आणि मी ते केलं. कोणताही धर्मगुरू हे लग्न लावून देण्यास तयार नाही. आता मी माझ्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याच्या प्रयत्नात दिल्लीला जाऊन तिथल्या धर्मगुरूंशी बोलणार आहे."

    follow whatsapp