मुंबईची खबर: भारतातील पहिलं मँग्रोव्ह पार्क लवकरच खुलं होणार! मुंबईतील गोराईसह 'या' भागात सुद्धा होणार निर्मिती...
बोरिवलीतील गोराई येथे देशातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कची निर्मिती पूर्ण झाल्याची बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात हे पार्क सामान्य जनतेसाठी खुलं होणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतातील पहिलं मँग्रोव्ह पार्क लवकरच खुलं होणार!
मुंबईतील गोराईसह 'या' भागात सुद्धा होणार निर्मिती...
Mumbai News: बोरिवलीतील गोराई येथे देशातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कची निर्मिती पूर्ण झाल्याची बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात हे पार्क सर्वसामान्य जनतेसाठी खुलं होणार असल्याची माहिती आहे. आधीच मुंबईच्या 50 किमी लांबीच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात खारफुटची झाडे म्हणजेच मँग्रोव्ह्स आहेत. आता मुंबईकरांसाठी गोराईच नव्हे तर दहिसरमध्ये देखील मँग्रोव्ह पार्क खुलं करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, गोराई आणि दहिसर येथील मँग्रोव्ह पार्कमुळे मुंबईला नवी ओळख मिळणार आहे. जवळपास 110 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या दोन्ही पार्क्समुळे पर्यावरण, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गोराई परिसरात 8 हेक्टर जमिनीत बांधण्यात आलेल्या मँग्रोव्ह पार्कमध्ये मँग्रोव्ह ट्रेल, बर्ड ऑब्जर्वेट्री आणि क्याक ट्रेल अशा सुविधा आहेत. मँग्रोव्ह ट्रेलमधील 800 मी. लांब असलेल्या वॉकवेच्या साहाय्याने पर्यटकांना मँग्रोव्हमध्ये प्रवेश करता येणार आहे. पार्कच्या या निर्मितील इको-टूरिझ्म प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलं आहे.
हे ही वाचा: न्याय मागण्यासाठी महिला अर्धनग्न अवस्थेत थेट पोलीस स्टेशनमध्ये... कुटुंबियांवर केले आरोप!
गोराई मँग्रोव्ह पार्कची वैशिष्ट्ये
- जवळपास 30 कोटी रुपये खर्च
- 800 मीटर लांब असलेला इको फ्रेंडली लाकडी मार्ग
- येथे दोन मजली मॅन्ग्रोव्ह्ज इंटरप्रिटेशन सेंटर, डिजिटल प्रदर्शने आणि किनारी स्थिरतेबद्दल माहिती
- स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी
इको-टूरिझ्मच्या दृष्टीने मोठं पाऊल
दहिसर मँग्रोव्ह पार्क मुंबईतील इको-टूरिझ्मच्या दृष्टीने मोठं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे. येथे एकाच ठिकाणी मँग्रोव्ह्सच्या जंगलांचं अनुभव मिळेल. या प्रोजेक्टसाठी तब्बल 80 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच, हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी! लाखोंच्या घरात मिळणार पगार... कधीपासून कराल अर्ज?
दहिसर मँग्रोव्ह पार्कची वैशिष्ट्ये
मुंबईतील दहिसर येथील मँग्रोव्ह पार्क जवळपास 30 हेक्टर जमिनीत बांधलं जाणार आहे. या प्रोजेक्टसाठी तब्बल 80 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आहे. 8 एप्रिल 2025 रोजी प्रोजेक्टची वर्क ऑर्डर जारी झाली असून या पार्कच्या कामाला सुरूवात झाल्याचं सांगितलं जात आहे. दहिसर येथील या मँग्रोव्ह पार्कला अधिकृतरित्या इको-टूरिझ्म योजना म्हणून मंजूरी मिळाली आहे. या पार्कमध्ये पर्यटकांसाठी नेचर इंटरप्रिटेशन सेंटर, वर्कशॉप हॉल आणि कॉन्फरन्स रूमसुद्धा उपलब्ध असतील तसेच, वॉकओव्हर मँग्रोव्ह ट्रेलची निर्मिती केली जाणार आहे.










