न्याय मागण्यासाठी महिला अर्धनग्न अवस्थेत थेट पोलीस स्टेशनमध्ये... कुटुंबियांवर केले आरोप!
कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक छळापासून न्याय मिळवण्यासाठी एक महिला अर्धनग्न अवस्थेत थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला अर्धनग्न अवस्थेत थेट पोलीस स्टेशनमध्ये...
कुटुंबियांवरच केले आरोप!
नेमकं प्रकरण काय?
Crime News: कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक छळापासून न्याय मिळवण्यासाठी एक महिला अर्धनग्न अवस्थेत थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडित महिलेला तिच्या दोन्ही दीरांना बेदम मारहाण केली आणि यामध्ये तिचे कपडे फाटल्याची माहिती आहे. तशाच अवस्थेत ती महिला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघाली. महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून स्थानिकांनी चादर ओढून तिचं शरीर झाकलं. महिलेच्या म्हणण्यानुसार, पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील इतर सदस्य त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुटुंबातील सदस्यांनी केले आरोप...
संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडे या प्रकरणासंदर्भात विनंती करून सुद्धा काहीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला. येथील मझौलीराज परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने सांगितलं की, तिच्या पतीचा पाच वर्षांपूर्वीच रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर, जमिनीच्या वाटपावरून तिचे दीर आणि इतर कुटुंबीय सतत वाद घालून पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे.
हे ही वाचा: Govt Job: इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीची मोठी संधी! लाखोंच्या घरात मिळणार पगार... कधीपासून कराल अर्ज?
मारहाणीत महिलेचे कपडे फाटल्याचा आरोप
गुरुवारी (6 नोव्हेंबर) पीडितेने जमिनीतील आपला वाटा मागितल्यानंतर कुटुंबियांनी तिच्यासाठी घराचे दरवाजे बंद केले. त्यावेळी, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांमध्ये वाद वाढत गेला आणि यात तिला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेचे कपडे देखील फाटल्याचा आरोप आहे. अपमान आणि मानसिक तसेच शारीरिक छळापासून वैतागलेल्या महिलेने अखेर अर्धनग्न अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी निघाली.
हे ही वाचा: प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट! पिस्तूलने गोळ्या झाडल्या अन्... अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना
पोलिसांनी दिली माहिती
वाटेत काही महिलांनी तिला सावरलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांना पीडितेच्या गावात पाठवण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे तिच्या दीरासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत वाद होते. याबाबात पीडितेच्या जावेवर सुद्धा आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार असून महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.










