Crime News : बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात घडली आहे. वडिलांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची शॉलने गळा आवळून हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने बहिणीच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: 25 वर्षीय सुनेवर सासऱ्याची जबरदस्ती! महिला गाढ झोपेत असताना गुपचूप खोलीत शिरला अन् सकाळी भलतंच दृश्य...
'बहिणीचे अपहरण केले'
रामनरेश यांनी आपली 26 वर्षीय मुलगी उमाकांती हिचा विवाह नोव्हेंबर 2025 मध्ये केला होता. मंगळवारी रामनरेश यांनी आपला मुलगा अजय (22) याला ई-रिक्षा देऊन उमाकांतीला तिच्या सासरहून आणण्यासाठी पाठवले होते. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अजय एकटाच घरी परतला आणि त्याने रडत सांगितले की, 'काही अज्ञात तरुणांनी मला अमली पदार्थ देऊन बहिणीचे अपहरण केले आहे.' या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.
'या' कारणामुळे केली हत्या
पोलिस अधीक्षक जे.पी. सिंह यांनी तपासाचे चक्रे फिरवली असता अजयने सांगितलेल्या घटनास्थळावर अपहरणाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तसेच, अजय आणि उमाकांती यांच्या मोबाईलचे लोकेशन त्याने सांगितलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच मार्गावर आढळून आले. संशय बळावल्याने पोलिसांनी रात्री दीड वाजता अजयची कडक चौकशी केली, तेव्हा त्याने बहिणीची हत्या केल्याचे कबूल केले. 'बहीण घरातील किरकोळ गोष्टींवरून वाद घालायची आणि वडील तिचेच ऐकायचे. तिच्याच सांगण्यावरून वडिलांनी मला आठवड्यापूर्वी घराबाहेर काढले होते,' असं कारण अजयने सांगितलं.
हे ही वाचा: नागपूर आरटीओ अधिकाऱ्याने युनिफॉर्म परिधान न करताच ड्युटी केली, बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप
पोलिसांना 10 हजारांचे बक्षीस
माहेरी येत असताना वाटेत पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात अजयने उमाकांतीच्याच शॉलने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील झुडपांमध्ये फेकून दिला. पोलिसांनी महादेव मंदिराजवळील झाडीतून उमाकांतीचा मृतदेह, शॉल आणि ई-रिक्षा जप्त केली आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा वेगाने छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस अधीक्षकांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT











