सेल्फीचा नाद लय वाईट, तरूणाचा गेला जीव.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना CCTV मध्ये कैद

Viral News : तरुण आपल्या कंपनीच्या चौथ्या मजल्यावरून सेल्फी काढत होता. सेल्फा काढताना तरुणाला आपला तोल न सांभाळता आल्याने तरुण जागीच मृत पावला आहे.

Viral News

Viral News

मुंबई तक

18 Jul 2025 (अपडेटेड: 18 Jul 2025, 10:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सेल्फीमुळे तरुणाने गमावला जीव

point

व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Viral News : सेल्फीमुळे अनेकांनी आपला मोलाचा जीव गमवाला आहे. याच सेल्फीमुळे एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. संकेत (वय 19) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. संकेत हा  एका कंपनीत प्रशिक्षणासाठी आला होता. जिथं करिअरची सुरुवात करायला गेला तिथंच त्याच्या करिअरचा आणि स्वत:चाही शेवट झाला. तो कंपनीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन सेल्फी काढत होता. त्याचवेळी त्याचा तोल गेला आणि चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना हरियाणातील सोनेपत जिल्ह्यातील राय पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?

सेल्फी काढताना तरुणाचा अंत

संबंधित अपघाताची माहिती पोलिसांच्या हाती येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले, त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तो मृतदेह कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कुटुंबियांनी सांगितलं की, संकेत हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. त्याला एका महिन्यापूर्वी एका औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इंटर्नशिप मिळाली होती. बिहारचा रहिवासी असलेला आदित्य देखील त्याच कंपनीत प्रशिक्षण घेत होता. घटनेच्याच दिवशी दोन्ही तरुण कंपनीच्या चौथ्या मजल्यावर गेले होते. तेव्हा संकेत सेल्फी घेत होता. त्यानंतर मित्र आदित्य त्या ठिकाणाहून खाली गेला आणि अनर्थ घडला. 

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं आंदोलन, पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "हे लोक तंबाखू मळून..."

मित्र खाली आला अन् संकेतचा तोल गेला 

मृत संकेतचा मित्र आदित्य भितीपोटी पुन्हा परत खाली आला. त्यानंतर क्षणार्धातच संकेतचा तोल जाऊन तो पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा घडलेला अपघात  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. कुटुंबाने दिलेल्या जबाबामुळे या पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.


 

    follow whatsapp