Shocking Viral News : गेल्या काही दिवसांपासून नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना व्हायरल होत आहेत. उत्तरप्रदेशच्या अलिगढमध्ये जावयाने सासूला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या लव्ह स्टोरीने सर्वत्र खळबळ उडवली होती. अशातच पुन्हा एका नव्या व्हायरल लव्ह स्टोरीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण सासऱ्याने सुनेसोबतच अफेअर सुरु केलं आणि नंतर मुलाची हत्या केली. हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या.
ADVERTISEMENT
आगरा येथील लडामदा गावात (जगदीशपुरा) 14 मार्चला होळीच्या दिवशी पुष्पेंद्र चौहानची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील अनेक खुलाचे समोर येत होते. पण जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलं, तेव्हा सगळ्यांना हादरा बसला. चाकूने हत्या झाल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं. मुलाची हत्या त्याच्या वडिलांनी केल्याचं तपासात समोर आलं. दरम्यान, या हत्याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?
पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती
पोलिसांनी म्हटलंय की, होळीच्या दिवशी पुष्पेंद्र आणि तिचे वडील चरण सिंह यांच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला होता. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात वडिलांनी त्यांच्या मुलाला लोखंडाच्या रॉडने मारलं आणि त्याची हत्या केली. पोलिसांचा तपास चार महिने सुरु होता.
...म्हणून वडिलांनी मुलाची केली निर्घृण हत्या
आरोपी वडिलांनी पोलिसांना खोटी माहिती देत हत्येचा गुन्हा कबूल केला नव्हता. परंतु, आता हत्येमागचं खरं कारण समोर आलं आहे. सासऱ्याचं त्याच्या सुनेसोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीबाबत जेव्हा त्याच्या मुलाला कळलं, तेव्हा त्यांच्यात वादविवाद सुरु झाले. त्यानंतर रागाच्या भरात वडिलांनी त्यांच्या मुलाची हत्या केली.
हे ही वाचा >> मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?
ADVERTISEMENT
