वासनांध भाऊजींचा मेव्हणीवर होता डोळा! एकतर्फी प्रेमाचा शेवट झाला भयंकर..दोन्ही मुलांना जंगलात मारलं!

Shocking Murder Case Viral :  मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका भाऊजींना दोन मुलांची आई असलेल्या मेव्हणीसोबत एकतर्फी झालं.

छत्तीसगडमध्ये वैवाहिक तणावात दोघांचा मृत्यू, बिलासपूरमध्ये खून आणि आत्महत्येच्या घटना

छत्तीसगडमध्ये वैवाहिक तणावात दोघांचा मृत्यू, बिलासपूरमध्ये खून आणि आत्महत्येच्या घटना

मुंबई तक

• 09:05 PM • 18 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाऊजींना मेव्हणीवर झालं एकतर्फी प्रेम अन्..

point

जंगलात मिळाले दोन मुलांचे मृतदेह

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Shocking Murder Case Viral :  मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका भाऊजींना दोन मुलांची आई असलेल्या मेव्हणीसोबत एकतर्फी झालं. प्रेमात वेडं झालेल्या या काकाने असं काही कांड केलं, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकी काय आहे ही धक्कादायक घटना, जाणून घ्या..

हे वाचलं का?

रिपोर्टनुसार, पूजाचं लग्न जवळपास 11 वर्षांपूर्वी छिंदवाडाच्या धर्मेंदसोबत झालं होतं. त्यानंतर दोघांना मयंक आणि दिव्यांश नावाची दोन मुलं झाली. महिलेचा पती छिंदवाडामध्ये हमालीचं काम करतो. दोघांमध्ये नेहमीच वादविवाद व्हायचा. 3 वर्षांपूर्वी दोघांचाही घटस्फोट झाला. महिला तिच्या दोन्ही मुलांना घेऊन सिवनी येथे गेली. येथे एका भाड्याच्या दुकानात राहिली. महिला मजुरी करून दोन्ही मुलांचं पालनपोषण करायची. मोठा मुलगा इयत्ता चौथी आणि छोटा मुलगा दुसरीत शिक्षण घेत होता.

भाऊजींना मेव्हणीवर झालं एकतर्फी प्रेम अन्..

भोजराम पुजाच्या घरी येजा करायचा. महिला दोन्ही मुलांसह पतीपासून वेगळं राहत होती. भोजराम पूजासोबत एकतर्फी प्रेम करायचा. पण मुलं नेहमीच त्यांच्या आईसोबत राहायची. यामुळेच आरोपीला त्याच्या प्रेमप्रकरणात यश मिळत नव्हतं. त्यामुळे त्याने मुलांना जंगलात नेत त्यांची गळा चिरून हत्या केली.

हे ही वाचा >> CM फडणवीस म्हणालेले, 'त्रिभाषा सूत्र लागू करूच..' उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान

जंगलात मिळाले दोन मुलांचे मृतदेह

त्यानंतर पूजाने 16 जुलैला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तिची दोन्ही मुलं मयंक आणि दिव्यांश 15 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेनंतर बेपत्ता झाले. त्यानंतर मुलांना शोधण्यासाठी नगर पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात कोतवाली, डुंडा सिवनी आणि अरी पोलीस स्टेशनची संयुक्त टीम बनवली. पोलिसांना सूचना मिळाली की, घसियार चौकातून एक तरूण ऑटो रिक्षामध्ये दोन मुलांना घेऊन जाताना दिसला आहे. ऑटोचा शोध लावून ड्रायव्हरला मुलांचे फोटो दाखवले.

त्यानंतर चालकाने त्यांना ओळखलं.पोलिसांनी भोजराम बेलवंशीला पकडलं आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर भोजराम यांनी म्हटलं की, 15 जुलैच्या संध्याकाळी साडेपाच वाजता मयंक म्हणजेच दिव्यांश शाळेतून घरी आला. त्यानंतर घसियारी चौक सिवनी येथून भाड्याच्या रिक्षात बसून सायकल देण्याच्या बहाण्याने जनता नगर चौकात घेऊन गेला.

हे ही वाचा >> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?

तिथे त्याचा मित्र शुभम उर्फ यशची भेट झाली. त्याच्या बाईकने मयंक, दिव्यांशसह आम्ही चौघे आमागढ येथून अंबामाई जंगलात गेले. भोजरामने कबुली दिली की, रात्री जवळपास साडेआठ वाजता दिव्यांश आणि मयंकची चाकूने गळा कापून हत्या केली. मृतदेहांना दगड्याच्या खाली लपवलं. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोर्समार्टमसाठी पाठवले.

    follow whatsapp