Kamal Kaur Bhabhi Murder News : इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असलेली भाभी म्हणजेच एन्फ्लुएन्सर कंचन कुमारीच्या हत्येबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमृतपाल सिंग महरोने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. अमृतपाल सिंग मेहरोने कमल (कंचन कुमारी) च्या हत्येची जबाबदारी घेत लिहिलं, खालसा कधीही महिलांवर हल्ला करत नाही. पण जेव्हा एका महिलेनं आमच्या संस्कृतीवर हल्ला केला. त्यामुळे तिला मारलं गेलं. कंचन, जिने सिख इतिहास आणि संस्कृतीला बदनाम करण्यासाठी 'कौर' नावाचा दुरुपयोग केला होता, त्यामुळे तिला शिक्षा देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कंचन कुमारी उर्फ कमलच्या हत्येनंतर अमृतपाल सिंग मेहरोंने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये या कारवाईमागचं कारण सांगण्यात आलं आहे. तिने पुरावा म्हणूनही अश्लील व्हिडीओ दाखवला. कंचन कुमारी उर्फ कमलच्या हत्येनंतर अमृतपाल सिंग मेहरोंने एक व्हिडीओ पोस्ट केला, यामध्ये कारवाईमागचं कारण सांगण्यात आलं आहे. तिने पुरावा म्हणून अश्लील व्हिडीओ दाखवला. अमृतपाल सिंग मेहरोने अन्य इन्स्टाग्राम यूजर्सला अशाप्रकारची पोस्ट न करण्यासाठी सूचना दिली. मेहरोने धमकी देत म्हटलं की, जर अशा लोकांनी असं करणं बंद केलं नाही, तर त्यांचीही अशीच परिस्थिती होईल. जेवढा वेळ ते जिवंत आहेत, ते पंजाबमध्ये अशाप्रकारचे अश्लील गोष्टी पसरवू देणार नाहीत.
हे ही वाचा >> विमानाच्या ढिगाऱ्यात सापडला DVR..हेच आहे का ब्लॅक बॉक्स? काय असतं या डिव्हाईसचं काम?
या प्रकरणाबाबत पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिलीय?
कंचन कुमारी उर्फ कमल कौर भाभीचा मृतदेह बठिंडा मध्ये एका गाडीत मिळाला होता. कमल कौर भाभी लुधियाना येथील रहिवासी होती. याप्रकरणी एसपी सिटी नरिंदर सिंगने म्हटलं की, पोलिसांना मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता खबर मिळाली होती की, रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये दुर्गंधी सुटली होती. तपास केल्यानंतर कारमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळाला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
पण नंतर खुलासा झाला की, तो मृतदेह कमल कौरचा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, घटनास्थळावरून कार ताब्यात घेण्यात आली आहे. मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. कार सोडून घटनास्थळावरून पळालेल्या संशयिताचा तपास सुरु करण्यात आला आहे. ज्या कारमध्ये मृतदेह सापडला आहे, त्या कारवर लुधियानाचा नंबर आहे. पण पोलिसांना हा नंबर फेक असल्याचाही संशय आहे.
हे ही वाचा >> सोनम आणि जितेंद्र कुशवाहा यांच्यातील नात्याबाबत खुलासा, लाखो रुपयांचा व्यवहार झाला उघड
दोन आरोपींना अटक
पंजाबची इन्स्टा क्वीन कंचन कुमारी उर्फ कमल कौर भाभीच्या हत्या प्रकरणात बठिंडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. बठिंडाची एसएसपी अमनीत कौंडलने शुक्रवारी म्हटलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या टीम बनवून तपास सुरु केला होता.
ADVERTISEMENT
