रायगड (छत्तीसगड): छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नी आणि नणंद यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न पतीला प्रचंड महागात पडला आहे. पत्नी आणि नणंद यांच्यात सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी गेलेल्या पतीचं चक्क पत्नीनेच गुप्तांग कापून टाकल्याचं धक्कादायक प्रकार इथे घडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, जवळच्या लोकांनी गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण कहाणी?
ही घटना 3 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राठिया या व्यक्ती पत्नी (वय 30 वर्ष) हिचा तिच्या पतीच्या बहिणीशी (नणंद) काही कारणावरून वाद सुरू होता. यादरम्यान, दोघींमध्ये बराच वेळ शिवीगाळ आणि वादविवाद सुरू होता. बराच वेळ झाला तरी दोघींमधील वाद काही संपत नव्हता. त्यामुळे अनिलने भांडण संपवावं यासाठी आपल्या पत्नीकडे गेला आणि तिला शांत करण्यासाठी प्रयत्न केले. पण या प्रकाराने अनिलची पत्नी ही अधिकच संतापली आणि तिने थेट पतीलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक, तिने किचनमधून एक धारदार शस्त्र बाहेर आणलं आणि थेट पतीच्या गुप्तांगावर वार करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये शारीरिक संबंधात मश्गूल होती पत्नी, तेवढ्यात आला पती आणि...
वेदनेने विव्हळत राहिला पती
या अचानक झालेल्या हल्ल्याने अनिल राठिया हा प्रचंड जखमी झाला. हल्ल्यानंतर तो वेदनेने जमिनीवर विव्हळत होता. घरातील इतर सदस्यांना आणि शेजाऱ्यांना या संबंध प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब त्याल जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित अनिल राठिया हा गावातच गवंडी म्हणून काम करतो.
हे ही वाचा>> पत्नीचे अनैतिक संबंध आणि तब्बल 5 वेळा घडला 'तो' प्रकार, पतीने मागचा-पुढचा विचार न करता थेट...
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आता पोलिसांनी अनिलच्या पत्नीविरुद्ध मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. डीएसपी सुशांतो बॅनर्जी यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, 3 ऑक्टोबर रोजी अनिल राठियाने त्याची पत्नी आणि त्याच्या बहिणीमधील वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, पत्नीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले. तक्रारीच्या आधारे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
