Crime News : एका विवाहित महिलेने आपल्या गावातीलच एका तरुणाला घरात बोलावून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. यात तो तरुण गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात तो तडफडू लागला. तरुणाच्या व्हिवळण्याच्या आवाज ऐकून शेजारी पोहोचले आणि तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला वाराणसी येथील रुग्णालयात हलवले. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : IPS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह परदेश दौऱ्यावर असतानाच स्वत:वर गोळ्या झाडल्या
अधिकची माहिती अशी की, ही धक्कादायक घटना सरपतहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डकहा गावात घडली आहे. या गावातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेने मंगळवारी उशिरा रात्री गावातीलच 22 वर्षीय तरुणाला आपल्या घरी बोलावले. आरोपानुसार, घरात आल्यावर तिने त्या तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याच्या आरडाओरडीनंतर शेजारच्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही गोष्ट तरुणाच्या कुटुंबीयांना कळवली. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथून त्याला पुढील उपचारासाठी वाराणसी येथे पाठवण्यात आले.
प्रेमसंबंधातून महिलेने हल्ला केल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ला करणाऱ्या महिलेचे पती अहमदाबाद येथे नोकरी करतात. तिने त्या तरुणावर असा हल्ला का केला, याबाबत अजूनही गूढ कायम आहे. काहीजणांच्या मते, त्यांच्या दरम्यान कथित प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच काही वैयक्तिक वाद निर्माण झाल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर वाराणसीत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाबाबत शाहगंजचे उपअधीक्षक अजीत सिंह चौहान यांनी सांगितले की, “डकहा गावात मंगळवारी उशिरा रात्री एका महिलेने गावातीलच तरुणाला बोलावून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारांसाठी वाराणसी येथे हलवण्यात आले आहे. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
