17 मुलींवर अत्याचार करणाऱ्या बाबाचा तुरुगांत शाही थाट, VIP सेलमध्ये शिफ्ट, कोणत्या सुविधा मिळतात?

Chaitanyanand Saraswati : 17 मुलींवर अत्याचार करणाऱ्या बाबाचा तुरुगांत शाही थाट, VIP सेलमध्ये शिफ्ट केलं, कोण कोणत्या सुविधा मिळतात?

Mumbai Tak

मुंबई तक

07 Oct 2025 (अपडेटेड: 07 Oct 2025, 04:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

17 मुलींवर अत्याचार करणाऱ्या बाबाचा तुरुगांत शाही थाट

point

चैतन्यानंद सरस्वतीला VIP सेलमध्ये शिफ्ट केलं

Chaitanyanand Saraswati Crime News : दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च संस्थेमध्ये 17 विद्यार्थीनींची लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणी चैतन्यानंद सरस्वती या बोगस अध्यात्मिक बाबाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या बाबाला अटक झाली, पण तुरुंगात त्याचा शाही थाट सुरु असल्याचं समोर आलंय. चैतन्यानंद सरस्वती याला आता तिहार जेलच्या  व्हीआयपी सेल क्रमांक 7 मध्ये हलवण्यात आले आहे. यापूर्वी शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सेल क्रमांक 4 मधील मुलायजा वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले होते. हा वॉर्ड पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्या आरोपींसाठी असतो, जिथे विविध प्रकारचे कैदी एकत्र ठेवले जातात.

हे वाचलं का?

तुरुंगात गेल्यानंतर चैतन्यानंद बनलाय चिडचिडा

अधिकच्या माहितीनुसार, जेलमध्ये आल्यानंतरपासून चैतन्यानंद अतिशय अस्वस्थ आणि चिडचिडा झाला आहे. त्याने पूर्ण रात्र उलटसुलट फिरत, सेलमध्ये हिंडत काढली. जेव्हा कर्मचाऱ्यांनी कारण विचारले, तेव्हा त्याने जेल स्टाफवर ओरडायला सुरुवात केली. रविवारी त्याला व्हीआयपी सेल क्रमांक 7 मध्ये हलवण्यात आले. हा सेल हायप्रोफाईल कैद्यांसाठी राखीव आहे. येथे कैदी वेगवेगळे ठेवले जातात आणि त्यांच्यावर 24 तास कडक नजर ठेवली जाते. सामान्य कैद्यांना या सेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई असते. चैतन्यानंद आता याच सेलमध्ये राहणार असून, येथे सुरक्षा आणि निरीक्षणासाठी कडक नियम आहेत.

हेही वाचा : बाप म्हणावं की कसाई? एका वर्षाच्या मुलावर धारदार शस्त्राने वार करत केला खून, आईनं सकाळी पाहिलं मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले असता, त्याच्या वकिलामार्फत जेलमध्ये विशेष सोयी-सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. त्यात कपडे, औषधे, खास जेवण, धार्मिक पुस्तके आणि दररोज भेटण्याची वेळ यांचा समावेश होता.

तिहार जेलमध्ये सर्व कैद्यांना जेल मॅन्युअलनुसार वागावे लागते. ज्यामध्ये झोपणे, उठणे आणि जेवणाचे वेळापत्रक निश्चित असते. चैतन्यानंदने शनिवारी जेलमधील जेवण्यास खाण्यास नकार दिला आणि स्वतःसाठी वेगळे जेवण मागितले. त्याशिवाय तो सेलमध्ये न राहता बाहेर राहण्याचा हट्ट करत होता, त्यामुळे त्याचा जेल कर्मचाऱ्यांशी वाद झाला.

व्हीआयपी कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा —

स्वतंत्र आणि सुरक्षित खोली दिली जाते.

घरून किंवा बाहेरून जेवण मागवण्याची परवानगी असू शकते.

चांगल्या प्रतीचे पलंग, टेबल आणि इतर सुविधा दिल्या जातात.

वाचनासाठी पुस्तके आणि वृत्तपत्रांची सोय केली जाते.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ व व्यायामाच्या सुविधा दिल्या जातात.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

घरात घुसून महिलेवर थेट बलात्कार... पण, वाचण्यासाठी पीडितेने दिली चकित करणारी ऑफर! CCTV मध्ये सगळं कैद

    follow whatsapp