बाप म्हणावं की कसाई? एका वर्षाच्या मुलावर धारदार शस्त्राने वार करत केला खून, आईनं सकाळी पाहिलं मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

मुंबई तक

Crime news : वडिलांनी आपल्या एका वर्षाच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करत ठार केलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे, नेमकं काय घडलंय समजून घ्या.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडिलांनीच एका वर्षाच्या मुलाचा केला खून

point

रुपेशला ड्रग्जचं व्यसन, पोलिसांची माहिती

Crime news : वडिलांनीच आपल्या एका वर्षाच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करत ठार केलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील आहे. हत्या करणाऱ्या वडिलांचं नाव रुपेश तिवारी असे आहे. तर हत्या केलेल्या मुलाचं नाव किनू तिवारी असे आहे. तर पत्नीचं नाव रिना तिवारी असे आहे. संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासन पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : जालना : पत्नीच्या पोटात वाढत होतं बाळ, कंटेनरने धडक देत अख्ख कुटुंबच चिरडलं, अंगावर काटा आणणारा भीषण अपघात

एका वर्षाच्या किनूवर धारदार शस्त्राने खून 

पोलिसांना काही सूत्रांनी संबंधित घटनेची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. रविवारी जिल्ह्यातील बैरिया भागातील सुरेमानपूर गावात शनिवारी रात्री रुपेश तिवारी नावाच्या व्यक्तीने आपल्या एका वर्षाच्या किनू नावाच्या मुलावर धारदार शस्त्राने वार केले. उपचारासाठी घेऊन जात असताना किनूचा मृत्यू झाला. बैरिया परिसरातील पोलीस उपधीक्षक मोहम्मद फहीम कुरेशी यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

त्यानं पुढे सांगितलं की, रुपेश तिवारी हा ड्रग्जचा व्यसनी आहे. तो वारंवार त्याच्या पत्नी आणि सासऱ्यांना शिवीगाळ करत सतत मारहाण करायचा. शनिवारी सायंकाळी रुपेश हे दारू पिऊन घरी आला आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. तसेच त्याने आपल्या वडिलांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. 

रुपेशला ड्रग्जचं व्यसन

मोहम्मद कुरैश यांनी रुपेश तिवारीबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. रुपेश तिवारीला ड्रग्जच्या व्यसनानं ग्रासलं आहे. तसेच त्याने पत्नीलाही बेदम मारहाण केली. शनिवारी सायंकाळी रुपेश दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नीसह आपल्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. त्याच्या पत्नीनं आपला मुलगा किनू आणि तीन वर्षांची मुलगी अनन्याला तिच्या सासऱ्यांकडे सोडून गेली. नंतर पतीच्या भीतीने ती त्याच गावात एका माणसाच्या घरी गेली आणि तिथेच रुपेश आणि त्याची दोन मुलं एकटीच होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp