विवाहित जोडप्याने एकत्र आयुष्य संपवलं! "मम्मी कोणाशी तरी फोनवर बोलायची..." अखेर मुलांनी पोलिसांनी सांगितली 'ती' गोष्ट

एका महिलेने पतीसोबत वाद झाल्यानंतर फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, पत्नीच्या मत्यूनंतर पतीने तिचा मृतदेह खाली उतरवला आणि नंतर त्याने देखील आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

"मम्मी कोणाशी तरी फोनवर बोलायची..." मुलांनी सांगितली 'ती' गोष्ट

"मम्मी कोणाशी तरी फोनवर बोलायची..." मुलांनी सांगितली 'ती' गोष्ट

मुंबई तक

• 12:23 PM • 07 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित जोडप्याने एकत्र आयुष्य संपवलं!

point

अखेर मुलांनी पोलिसांनी सांगितली 'ती' गोष्ट

Crime News: उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने पतीसोबत वाद झाल्यानंतर फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, पत्नीच्या मत्यूनंतर पतीने तिचा मृतदेह खाली उतरवला आणि नंतर त्याने देखील आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित प्रकरण  महाराजपुर पोलीस स्टेशन परिसरातील बंबुरिया गावातील असल्याची माहिती आहे. दुसऱ्याच दिवशी, मुलं आई-वडिलांच्या खोलीत गेल्यानंतर, त्यांना मोठा धक्का बसला. त्यावेळी, आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला आणि वडिलांचा मृतदेह फाशीला लटकलेल्या अवस्थेत मुलांना दिसला. 

हे वाचलं का?

मुलांचं रडणं आणि ओरडणं ऐकून जवळच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि यासंबंधी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा तपास करून पुरावे गोळा केले. 40 वर्षीय बाबू आणि त्याची 35 वर्षीय पत्नी शांती अशी मृतांची ओळख असल्याचं समोर आलं आहे. बाबूची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर, त्याने सात वर्षांनंतर सरसौली येथील रहिवासी असलेल्या शांती नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. शांतीने सुद्धा दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. संबंधित जोडप्याला तीन मुलं असून पहिल्या पत्नीची दोन मुलं सुद्धा त्यांच्यासोबत राहत होते, असं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: शारीरिक संबंध ठेवले, नंतर निर्दयीपणे हत्या करून मृतदेह घरातच पुरला! अन् तिथेच पलंगावर... 'असा' झाला खुलासा

पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला अन्...

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (5 ऑक्टोबर) रात्री बाबू आणि शांतीमध्ये काही कारणावरून मोठा वाद झाला. शांती काही दिवसांपासून कोणाशी तरी फोनवर सतत बोलत असून तिचा पती पत्नीच्या या वागण्याला विरोध करत होता, असं नातेवाईकांनी सांगितलं. याच कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. आपली आई सतत कोणाशी तरी फोनवर बोलायची आणि यावरून पप्पा नाराज होते, असं मुलांनी पोलिसांना सांगितलं.

हे ही वाचा: मुंबईमध्ये प्लॉट घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना घातला गंडा, आरोपींची 'ती' ट्रिक अन् तब्बल 6 लाख रुपये...

पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सवरून झालं स्पष्ट   

पोलिसांनी या प्रकरणासंबंधी माहिती देताना सांगितलं की पती आणि पत्नीमधील वाद हेच आत्महत्येमागचं मुख्य कारण असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सच्या आधारे, पीडितेने पतीसोबत झालेल्या वादानंतर फाशी घेऊन स्वत:ला संपवलं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर, बाबूने आपल्या पत्नीचा मृतदेह खाली उतरवला आणि त्याने स्वत: फाशी घेत आत्महत्या केली. फाशी घेतल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सवरून स्पष्ट झालं. पोलीस या प्रकरणाचा खोल तपास करत असून नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp