मुंबईमध्ये प्लॉट घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना घातला गंडा, आरोपींची 'ती' ट्रिक अन् तब्बल 6 लाख रुपये...
एका जमिनीच्या व्यवहारात 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या आरोपाखाली एक महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईमध्ये प्लॉट घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना घातला गंडा

आरोपींनी कशी केली फसवणूक?
Mumbai Crime: ठाणे जिल्ह्यातून एका जमिनीच्या व्यवहारात 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या आरोपाखाली एक महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. सोमवारी (6 ऑक्टोबर) या प्रकरणासंबंधी पोलिसांनी माहिती दिली. मीरा-भायंदर आणि वसई-विरार (MBVV)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मीना म्हात्रे आणि तिचा मुलगा यांनी तक्रारदार व्यक्तीशी संपर्क साधला आणि जुलै 2018 मध्ये आरोपींनी त्यांची वजिलोपार्जित जमिनीचा भाग विकणार असल्याचं सांगितलं.
एका नातेवाईकाला प्लॉट आधीच ट्रान्सफर...
एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी त्याच वर्षाच्या कालावधीत रोख पैसे आणि चेकच्या माध्यमातून 6 लाख रुपये घेतले आणि त्यांनी पीडितांना 7 लाख रुपयांचा एक प्लॉटचा विक्री करार (सेल डीड) बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. आरोपीने राजीनामा पत्राद्वारे त्याच्या एका नातेवाईकाला प्लॉट आधीच ट्रान्सफर केला असल्याचं नंतरच्या तपासात दिसून आलं.
हे ही वाचा: चक्क वकिलानेच सरन्यायाधीशांवर केला हल्ल्याचं प्रयत्न, भूषण गवई फक्त 'एवढंच' म्हणाले अन्...
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC), 2023 च्या कलम 316 (2) (विश्वासघात) आणि 316 (4) (फसवणूक) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: क्रिकेट हा निव्वळ व्यवसाय, त्यामध्ये खेळासारखं काही राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्व टिप्पणी
नागरिकांना आवाहन
जमीन किंवा मालमत्तेच्या विक्रीत फसवणुक केल्याचं हे पहिलंच प्रकरण नाही, तर दररोज यासंबंधीची प्रकरणे समोर येत असतात. अशा घटनांमध्ये कधी कागदपत्रांमध्ये घोटाळा करून किंवा कधी इतर मार्गाने फसवणूक केली जाते. नागरिकांनी अशा प्रकारचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहन करण्यात आलं आहे.