क्रिकेट हा निव्वळ व्यवसाय, त्यामध्ये खेळासारखं काही राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्व टिप्पणी

मुंबई तक

Supreme Court on cricket : क्रिकेट हा निव्वळ व्यवसाय, त्यामध्ये खेळासारखं काही राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्व टिप्पणी

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

क्रिकेट हा निव्वळ व्यवसाय, त्यामध्ये खेळासारखं काही राहिलं नाही

point

सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्व टिप्पणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. याबाबत क्रिकेटप्रेमींकडून उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.  क्रिकेट आणि इतर क्रीडा प्रकारांच्या वाढत्या व्यावसायिकीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि.7) थेट भाष्य करत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट म्हटलं की, आता क्रिकेट आणि इतर खेळांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : चक्क वकिलानेच सरन्यायाधीशांवर केला हल्ल्याचं प्रयत्न, भूषण गवई फक्त 'एवढंच' म्हणाले अन्...

'क्रिकेटमध्ये खेळासारखं काही उरलेलं नाही", सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

जबलपूर विभागातील एका क्रिकेट संघटनेशी संबंधित याचिकेवर सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटलं, “आता क्रिकेटमध्ये खेळासारखं काही उरलेलं नाही. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे.” सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नाथ यांनी उपस्थित वकिलांना हलक्याफुलक्या शब्दांत विचारलं, “आज आपण क्रिकेट खेळतोय. चार प्रकरणं आहेत. एका प्रकरणाची सुनावणी आधीच दुसऱ्या फेरीसाठी तहकूब करण्यात आली आहे. हे दुसरे प्रकरण आहे. आणखी दोन प्रकरणे आहेत. म्हणजे आज किती टेस्ट मॅच खेळणार आहात?”

हेही वाचा : Personal Finance: तुम्हीही टर्म इन्शुरन्स खरेदी करताना 'या' 4 चुका करता? वेळीच व्हा सावध नाहीतर..

हे वाचलं का?

    follow whatsapp