बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. 'वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी...' अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
वाल्मिक कराडसाठी वर्गणी मागणारा तांदळे कोण?
याच बॅनरसोबत फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. संदिप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढेच नाही तर सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर याच संदीप तांदळे याने वाल्मिक कराडच्या फोटो झळकावला होता.
हे ही वाचा>> पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडच्या पोस्टरबाजीची चर्चा, पोस्टरवरील आशयाने वेधलं लक्ष
आता मदत निधीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर हे बॅनर कोणी तयार केले त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवान भक्ती गडाच्या ट्रस्टने केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंमळनेर पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे.
वाल्मिक कराडचा फोटो लावून दसरा मेळाव्यासाठी मदत करा असे बॅनर आले समोर
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मदत करा त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी मदत करावी असा मजकूर बॅनरवर छापून स्कॅनर तयार करून वाल्मिक कराडचा फोटो लावून मदत मागणाऱ्या संदीप तांदळे यांची प्रतिक्रिया आता या प्रकरणी समोर आली आहे. 'मला बदनाम करण्यासाठी आणि मला गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी हे बनावट बॅनर व्हायरल केले आहे. अशी प्रतिक्रिया तांदळेने दिली आहे.
हे ही वाचा>> नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
