कॅन्सर पीडित बापाला स्वत: अंत जवळ आल्याची जाणीव, पोटच्या मुलांना विषारी औषध पाजलं अन् स्वत:ही

Crime News : कॅन्सर पीडित बापाचं संतापजनक कृत्य, पोटच्या मुलांना विषारी औषध पाजलं अन् स्वत:ही..

Mumbai Tak

मुंबई तक

07 Oct 2025 (अपडेटेड: 07 Oct 2025, 02:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कॅन्सर पीडित बापाचं संतापजनक कृत्य

point

पोटच्या मुलांना विषारी औषध पाजलं अन् स्वत:ही केली आत्महत्या

Crime News : कर्करोगाने त्रस्त असलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलांची विषारी औषध देऊन हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.  मेरामन क्षेत्रिया असं चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या बापाचं नाव आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : कॅन्सरग्रस्त सासूच्या उपचारासाठी पैसे आण, सांगलीतील प्रेमविवाह केलेल्या मुलीचा छळ; शेवटी विषारी औषध घेतलं अन्...

स्वतःचा अंत जवळ येत असल्याची जाणीव दोन मुलांना विषारी औषध पाजलं 

अधिकची माहिती अशी की, ही घटना सोमवारी संध्याकाळी लांबा गावात घडली. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मेरामन क्षेत्रिया नावाचा हा व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होता. स्वतःचा अंत जवळ येत असल्याची जाणीव झाल्याने त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या मृत्यूनंतर मुलांचं भविष्य काय होईल, या विचाराने तो सतत चिंतेत होता. त्यामुळे त्याने मुलांना विषारी औषध पाजून संपवलं. त्यानंतर त्याने स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. 

कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा 

कल्याणपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी.सी. पटेल यांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. मृत पित्याने आधी दोन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर आणि गावावर देखील शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी या अत्यंत दुःखद घटनेने हळहळ व्यक्त करत आहेत. पोलिस आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की विष कुठून आणि कसे आणले गेले? तसेच घटनेमागील सर्व परिस्थितींची सखोल चौकशी केली जात आहे.

दरम्यान, आत्महत्या करायची होती तर स्वत: करायची होती. निष्पाण मुलांना विषारी औषध पाजून त्यांचा जीव घ्यायची काय गरज होती? अशी भावना काही गावकरी बोलून दाखवत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई : 'तो आला त्यानं पार्सल दिलं अन् माझ्या छातीला हात लावला', ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयचं वासनांध कृत्य CCTV मध्ये कैद

    follow whatsapp