Nilesh Ghaywal, Pune Crime : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याने परदेशात पळ काढलाय. दरम्यान, आता पोलिसांनी निलेश घायवळ याच्या पुण्यातील कोथरूड परिसरातील घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पोलिसांनी या छापेमारीत निलेश घायवळ यांच्या दोन घरांची झाडाझडती केली. यावेळी त्यांच्या घरातून जिवंत काडतुसे आढळून आले.
ADVERTISEMENT
आहिल्यानगर नंतर निलेश घायवळच्या पुण्यातील घराची झाडाझडती
निलेश घायवळ सध्या परदेशात फरार असल्याने पोलिसांनी त्याच्या पुण्यातील घरावर कारवाई केली आहे. याआधी पुणे पोलिसांच्या पथकाने निलेश घायवळ यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरावरही छापेमारी केली होती. पोलिसांच्या या कारवाईमागे त्याच्याविरोधातील तपास अधिक गतीने पुढे नेण्याचा उद्देश असल्याचे समजते.
हेही वाचा : 'हे' औषध तुमच्या घरात असेल तर लगेच कळवा, सरकार हाय अलर्टवर; अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी
निलेश घायवळने परदेशात पळ काढल्याने पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी घरातील सर्व खोल्या आणि घराजवळच्या परिसराची सविस्तर पाहणी केली. या छापेमारीत निलेश घायवळ याच्याशी संबंधित महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे आणि संशयास्पद सामग्री मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्याविरोधात चालू असलेल्या तपासामध्ये या वस्तूंचा महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या मते, निलेश घायवळ याची फरारी असूनही त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. पुणे पोलिसांचे पथक सतत त्याच्या हालचालींचा मागोवा घेत असून, त्याला लवकर अटक करण्यासाठी सर्व शक्यतो उपाययोजना राबवत आहे.
निलेश घायवळच्या घरात काय काय सापडलं?
पोलिसांनी निलेश घायवळ यांच्या पुण्यातील घरावर छापेमारी करून त्यांच्याकडून मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनींची कागदपत्रे, बँक पासबुक आणि इतर दस्तऐवज हस्तगत केले. या जमिनीचे व्यवहार मुख्यतः पवनचक्की उद्योगांसह असलेल्या परिसराशी संबंधित आहेत. तसेच, घरातून पोलिसांना अनेक जिवंत काडतूसही सापडल्या. या कारणास्तव पोलिसांनी घायवळ यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. एकूण 40 कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली असून, घायवळने काही वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय राहून बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. या भागातील पवनचक्की उद्योगधंद्यांमधील मालकांना धमकावून घायवळने मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्याचे व्यवहार केले होते. पोलिस आणि स्थानिक सूत्रांनुसार, त्याला या कृतीसाठी काही राजकीय नेत्यांकडून पाठबळ मिळाल्याचे समजते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अनिल परबांच्या आरोपांनंतर रामदास कदम यांच्या पत्नी समोर, 1993 साली काय घडलं? सगळंच सांगितलं
ADVERTISEMENT
