शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान, अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं

Gujarat Crime News : महिलेने आपल्या पतीला हळदीचे दूध दिले होते. त्या दुधात तिने उंदरामारण्याचं औषध मिसळल्याचा आरोप आहे. मात्र त्या वेळी पतीचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी, 5 जानेवारीलाच महिलेने पतीचा गळा दाबून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Gujarat Crime News

Gujarat Crime News

मुंबई तक

27 Jan 2026 (अपडेटेड: 27 Jan 2026, 02:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान

point

अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं

Gujarat Crime News, सूरत : गुजरातमधील सूरत शहरात एका 37 वर्षीय महिलेने पतीची हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र पतीच्या भावाने अंत्यसंस्काराबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक अहवालात विषप्रयोग व गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

हे वाचलं का?

ही घटना सूरतमधील लिम्बायत परिसरातील असून संबंधित दाम्पत्य मूळचे बिहारचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक एन. के. कमलिया यांनी सांगितले की, 5 जानेवारी रोजी महिलेने आपल्या पतीला हळदीचे दूध दिले होते. त्या दुधात तिने उंदरामारण्याचं औषध मिसळल्याचा आरोप आहे. मात्र त्या वेळी पतीचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी, 5 जानेवारीलाच महिलेने पतीचा गळा दाबून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुरुवातीला पत्नीने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांकडून प्राथमिक तपासात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.

हेही वाचा : महालक्ष्मी अन् तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत काळाचा घाला; चौघांचा मृत्यू

मृताच्या भावाने अंत्यसंस्काराबाबत आक्षेप घेतला. पत्नी मृतदेहाचा तिथेच तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरत होती. याच वादातून मृताच्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करत सखोल तपासाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे फॉरेन्सिक परीक्षण करण्याचे आदेश दिले. फॉरेन्सिक अहवालात मृत्यू हा नैसर्गिक नसून विषप्रयोग आणि गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत महिलेने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिस तपासानुसार, महिलेने पतीकडून सातत्याने होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. पती मुंबईत मजुरीचे काम करत होता आणि महिन्यातून एकदाच सूरतमधील घरी येत असे. पत्नीच्या म्हणण्यानुसार, पती शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन करून तिच्यावर जबरदस्ती करत असे, ज्यामुळे तिला शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणात पोलिसांनी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद आणि घरगुती हिंसाचाराच्या गंभीर प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सरस्वतीच्या मूर्ती विसर्जनानंतर 15 वर्षीय मुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
 

    follow whatsapp