रिनोवेशनचे काम सुरु असताना पाऊस आला, मजूर पडीक खोलीत आश्रयाला गेले, अन् दोन वर्ष सडलेला मृतदेह आढळला

Crime News : बीके रुग्णालयात सध्या रिनोवेशनचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी काही मजूर जमिनीखाली केबल टाकण्याचे काम करत होते. त्याचवेळी अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी मजूर जवळच असलेल्या जुन्या, मोडकळीस आलेल्या ट्यूबवेलच्या खोलीत आश्रयासाठी शिरले. मात्र, खोलीत पाऊल टाकताच त्यांना आत पडलेला सांगाडा दिसला आणि त्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. भीतीपोटी मजूर तात्काळ बाहेर पळाले आणि घटनेची माहिती रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागाला दिली.

Crime News

Crime News

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 08:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रिनोवेशनचे काम सुरु असताना पाऊस आला

point

मजूर पडीक खोलीत आश्रयाला गेले,

point

अन् दोन वर्ष सडलेला मृतदेह आढळला

Crime News :  हरियाणातील फरीदाबाद येथील बादशाह खान (बीके)  रुग्णालय परिसरात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या आवारातीलच एका जुन्या आणि बंद अवस्थेत असलेल्या ट्यूबवेलच्या खोलीत मानवाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक पाहणीत या मृतदेहाचा सांगाडा बनलाय. हा मृतदेह सुमारे दोन वर्षे त्या खोलीत कुजत राहिल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा मृतदेह रुग्णालयाच्या आवारातच कुजत राहिला, मात्र इतक्या दीर्घकाळात कुणालाही त्याची चाहूल लागली नाही, हे अधिकच धक्कादायक आहे.

हे वाचलं का?

बीके रुग्णालयात सध्या रिनोवेशनचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी काही मजूर जमिनीखाली केबल टाकण्याचे काम करत होते. त्याचवेळी अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी मजूर जवळच असलेल्या जुन्या, मोडकळीस आलेल्या ट्यूबवेलच्या खोलीत आश्रयासाठी शिरले. मात्र, खोलीत पाऊल टाकताच त्यांना आत पडलेला सांगाडा दिसला आणि त्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. भीतीपोटी मजूर तात्काळ बाहेर पळाले आणि घटनेची माहिती रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागाला दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणेत हालचाल सुरू झाली. एनआयटी पोलिस चौकीचे प्रभारी मनोज कुमार, एसजीएम नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ सुनील कुमार यांच्यासह गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात समोर आले की, संबंधित ट्यूबवेल गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत होता. त्यामुळे या भागात कुणाचीही नियमित ये-जा नव्हती. खोलीचा दरवाजाही बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने हा परिसर कुणाच्याच लक्षात आला नाही.

पोलिसांसमोर आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे मृतदेह कुजताना दुर्गंधी का पसरली नाही? याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्यूबवेलची खोली रुग्णालयाच्या शवागाराच्या अगदी जवळ आहे. शवागार परिसरात सतत औषधांचा, रसायनांचा आणि विविध वासांचा संमिश्र वास असतो. त्यामुळे मृतदेहाची दुर्गंधी इतर वासांमध्ये मिसळून गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच रुग्णालयातील कर्मचारी किंवा परिसरातील लोकांच्या नजरेत हा प्रकार आला नसावा.

पोलिसांनी व्यक्त केल्या दोन शक्यता

या प्रकरणाचा तपास करताना पोलिस दोन शक्यतांवर काम करत आहेत. पहिली शक्यता म्हणजे, एखाद्याची हत्या करून मृतदेह या सुरक्षित आणि निर्जन ठिकाणी लपवण्यात आला असावा. दुसरी शक्यता अशी की, कोणीतरी व्यसनाधीन व्यक्ती त्या ठिकाणी झोपण्यासाठी गेली असावी आणि अंमली पदार्थांचे अतिसेवन किंवा आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. सध्या या दोन्ही शक्यतांचा तपास सुरू आहे.

डीएनए चाचणीतून होणार ओळख

पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन तो ईएसआय मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवला आहे. बुधवारी त्याचे पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. पोलिस चौकी प्रभारी मनोज कुमार यांनी सांगितले की, सांगाड्याची अवस्था पाहता सध्या तो पुरुषाचा आहे की महिलेचा, हे निश्चित सांगणे कठीण आहे. पोस्टमॉर्टेम अहवाल आणि डीएनए चाचणीनंतरच मृताची ओळख पटू शकणार आहे. तसेच, गेल्या दोन ते तीन वर्षांत फरीदाबाद शहरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नोंदीही पोलिस तपासत आहेत. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या गूढ प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : माझ्या गावची कामं तू का करतोस..? सरपंचाकडून बाजार समितीच्या संचालकावर हल्ला, व्हिडीओ व्हायरल

    follow whatsapp