बलात्काराच्या आरोपात आधीच तुरुंगात, पॅरोलवर सुटल्यानंतर देखील मोलकरणीच्या मुलीला सोडलं नाही अन् पत्नीच्या मैत्रिणीसोबत सुद्धा...

बलात्काराच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याने पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने आणखी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:33 PM • 27 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बलात्काराच्या आरोपाखाली आधीच तुरुंगात

point

पॅरोलवर सुटल्यानंतर देखील मोलकरणीच्या मुलीला सोडलं नाही

point

पत्नीच्या मैत्रिणीसोबत सुद्धा नको ते कृत्य..

Crime News: दिल्ली पोलिसांच्या वेस्टर्न रेंज गुन्हे शाखेच्या पथकाने बलात्काराच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याने पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने आणखी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. 33 वर्षीय करण डोलतानी अशी आरोपीची ओळख असून तो दिल्लीतील मटियाला एक्सटेंशनचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करताना, हा आरोपी त्याच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीशी आणि स्वतःच्या मोलकरणीच्या मुलीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते.  

हे वाचलं का?

मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार 

पोलिसांच्या माहितीनुसार, 2016 मध्ये आरोपी करणने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणासंबंधी बिंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आणि त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्याचं हे घृणास्पद कृत्य एवढ्यावरच थांबलं नाही. तुरुंगात शिक्षा भोगत असताना, त्याने त्याच्या पत्नीच्या आजारपणाचे कारण देत 28 दिवसांचा अंतरिम जामीन मिळवला.

जामिनावर बाहेर असताना, त्याने त्याच्या पत्नीच्या एका मैत्रिणीला टार्गेट केलं. त्याने तिच्यावर केवळ बलात्कारच नाही तर तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्ये देखील केली. याप्रकरणी बिंदापूर पोलिस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये पॉक्सो कायद्याचे कलम देखील जोडले गेले. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी करण फरार झाला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: 21 किमी लांब वॉटर टनल प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल! आता, मुंबईकरांची पाणी टंचाई दूर होणार...

आरोपीला अटक करण्यासाठी, डीसीपी यांनी एक विशेष पथक तयार केलं. पोलिसांनी मॅन्युअल इंटेलिजेंस आणि टेक्निकल सर्व्हिलांसचं मजबूत नेटवर्क तैनात केलं. दरम्यान, कॉन्स्टेबलला आरोपी करण डोलतानी हा गुरुग्राममधील घामरोज टोल प्लाझाजवळ येत असल्याची माहिती मिळाली. एसीपींच्या देखरेखीखाली, पथकाने टोल प्लाझाजवळ आरोपीला अटक केली. 

पोलिसांसाठी मोठं ऑपरेशनल यश

करण डोलतानीची अटक हे दिल्ली पोलिसांसाठी एक मोठं ऑपरेशनल यश आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा गुन्हेगारांना समाजात मुक्तपणे फिरू देणं हे सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. आरोपीने केवळ अंतरिम जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नाही तर कायदेशीर प्रक्रियेतही अडथळा आणला. त्याच्या अटकेनंतर, त्याला आता पुन्हा तुरुंगात पाठवण्यात येत आहे, जिथे त्याला त्याच्या मागील शिक्षेसाठी तसेच नवीन प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

    follow whatsapp