जिलेबीसाठी दुकानदाराने पैशांची मागणी करताच ग्राहक शिक्षक संतापला, मालकाला उकळत्या तेलात ढकललं

crime news : शाळेतील एका शिक्षकाने जिलेबी विकणाऱ्या एका मिठाई दुकानदाराला तेलात ढकलले. दुकानदाराने शिक्षकाला पैशांची मागणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात दुकान मालक भाजून निघाला होता. जिलेबीवाल्याने आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:53 PM • 27 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाने 50 किलो जिलेबी ऑर्डर केली

point

शिक्षकाने दुकानदाराला उकळत्या तेलात ढकलले

Crime news : शाळेतील एका शिक्षकाने जिलेबी विकणाऱ्या एका मिठाई दुकानदाराला तेलात ढकलले. दुकानदाराने शिक्षकाला पैशांची मागणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात दुकान मालक भाजून निघाला होता. जिलेबीवाल्याने आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्षकाचे नाव वीरेंद्र यादव असे आहे, पीडित दुकानदाराचे नाव प्रकाश शाहा असे आहे, ही घटना बिहारच्या खगारिया जिल्ह्यत घडल्याचं वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : प्रेशर पंपाचा वापर करून तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरली, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली, लाज आणणारा प्रकार

शिक्षकाने 50 किलो जिलेबी ऑर्डर केली

प्रकाश शाहा यांनी पोलिसांना सांगितलं की, 25 जानेवारी रोजी सरस्वती पूजा साजरी करण्यासाठी पीरनगरा माध्यमिक शाळेच्या परिसरात एक मेळा भरवण्यात आला होता. मेळावादरम्यान शिक्षक वीरेंद्र यादव हे दुकानात गेले असता, त्यांनी 50 किलो जिलेबीची ऑर्डर केली होती. 26 जानेवारी रोजी त्यांच्या शाळेत जिलेबी घेऊन गेले होते.

हे ही वाचा : पुणे हादरलं! आईनेच मुलाचा गळा चिरला; मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न, वाघोली परिसरातील घटना

शिक्षकाने दुकानदाराला उकळत्या तेलात ढकलले

या प्रकरणात पीडित प्रकाश शाहा यांनी आरोप केला की, त्याने शिक्षकाकडे पैशांची मागणी केली होती. तेव्हा संतापलेल्या शिक्षकाने त्याला उकळत असलेल्या तेलात ढकलून दिले होते. शिक्षक एवढ्यावरच न थांबता त्यांने दुकानदाराकडून दीड हजार रुपये हिसकावून घेतले होते. संबंधित प्रकरणात पीडित दुकानदाराला आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. दुकानदाराच्या अर्जाच्या आधारे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, असे पोलिसांनी सांगितलं,  

    follow whatsapp