गोंदिया : शेजाऱ्यानेच चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला; 20 लाखांचा ऐवज लंपास; आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

Crime news : गोंदिया शहरातील सेलटॅक्स कॉलनी परिसरात झालेल्या खळबळजनक दरोड्याचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. २६ जानेवारीच्या मध्यरात्री हा दरोडा घालण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनीच टाकण्यात आलेल्या या दरोड्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. हा दरोडा टाकून मध्यप्रदेशात फरार झालेल्या बाप-लेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 03:45 PM • 27 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेजाऱ्यानेच चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला

point

20 लाखांचा ऐवज लंपास

point

आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

Crime news : गोंदिया शहरातील सेलटॅक्स कॉलनी परिसरात झालेल्या खळबळजनक दरोड्याचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. २६ जानेवारीच्या मध्यरात्री हा दरोडा घालण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनीच टाकण्यात आलेल्या या दरोड्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. हा दरोडा टाकून मध्यप्रदेशात फरार झालेल्या बाप-लेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ट्रेन उशीरा आल्याने पेपर चुकला, आता विद्यार्थीनीला भरपाई म्हणून 9 लाख रुपये मिळणार!

नेमकं काय घडलं?

26 जानेवारीच्या मध्यरात्री प्रतीक उईके यांच्या घरात हा दरोडा घालण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास उईके यांच्या घराचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडताच दोन दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी तोंडाला कापड गुंडाळले होते. आरोपींनी प्रतीक आणि त्यांच्या आईला चाकूचा धाक दाखवून ओलीस ठेवले. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, माय-लेकांना बेदम मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी घरातून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमालासह पळ काढला.

असा लागला छडा

गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयाची सुई घरासमोर भाड्याने राहणाऱ्या पिता-पुत्राकडे वळली. तपासात असे समोर आले की, मुकेशकुमार डोंगरे (59) आणि त्याचा मुलगा आर्यन डोंगरे (24) हे घटनेनंतर गायब होते. पोलिसांनी टेक्निकल बाबी तपासून खबऱ्यांच्या मदतीने त्यांचा माग काढला.

हे ही वाचा : क्रिकेट मॅच हरल्याने संताप, रात्री दारु पिताना जीवघेणा वाद, मित्र कारच्या दरवाजाला लटकला, पण रोशनने गाडी झाडाला ठोकली

मध्यप्रदेशातून अटक

दोन्ही आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून दोघांना मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले दागिने आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत 22 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp