Sangli Crime, स्वाती चिखलीकर : किरकोळ कारणांवरुन वाद झाल्यानंतर थेट जीव घेणे यातून आपला समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याचे दर्शन होते. अशीच एक घटना सांगलीत घडली आहे. निमित्त होतं माव्याचं. सांगलीतील एका 28 वर्षीय तरुणाने फक्त मावा मागितल्याने तिघांनी त्याला चाकूने भोसकल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचार सुरु असताना या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. नारायण पवार (28) असं या तरुणाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : EMI ला वैतागला; वाशिमचा 25 वर्षीय इंजिनीअर बनला चोर, मध्यप्रदेशात करायचा चोऱ्या
का झाला वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून सांगलीच्या वडर गल्लीमध्ये नारायण पवार या 28 वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले होते. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नारायण पवार याच्या खून प्रकरणी बिल्ला रामा पवार, कुणाल जाधव आणि चंदू नाईक या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
..म्हणून चाकूने भोसकले
नारायण पवार याने या तिघा संशयीतांकडे मावा मागितला होता. मावा दे म्हटल्याने त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. यानंतर संतापलेल्या तिघांनी नारायण पवार या तरुणाला चाकूने भोसकले होते.
हे ही वाचा : नांदेड : महसूल सेविकेचा सुनेनेच केला खून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
एकाला अटक
हल्ला झाल्यानंतर नारायण पवार याला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघा संशयीतापैकी एकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT











