Engineer turned into thief : महागड्या जीवनशैलीचा शौक अनेकांना असतो. त्यासाठी कर्ज काढून त्याचे हप्ते भरत बसण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. पण हप्ते फेडण्यासाठी पैसेच पुरत नसतील तर काय करायचे? यासाठी एक इंजिनीअर चोर बनला आहे. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्याने इंजिनीअर असलेल्या 25 वर्षीय तरुणाला चोरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी त्याने ट्रेनमध्ये चोरी करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील हा इंजिनीअर मध्यप्रदेशातील खंडवा येथील एका ट्रेनमध्ये चोरी करताना पकडला गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आरोपी इंजिनीअरने हप्त्यावर एक बाईक खरेदी केली होती. मात्र हप्ते भरायला पैसे नसल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करला. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याने लक्ष्य केले. नुकतंच मध्यप्रदेशातील खंडवा येथे त्याने एका महिलेची पर्स चोरी केली होती. यामध्ये मोबाईल, रोकड आणि अन्य किमती सामान होते.
खबऱ्यामार्फत मिळाली माहिती
24 जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन पटन्याला जाणाऱ्या जनता एक्सप्रेसमध्ये त्याने चोरी केली. एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेची पर्स त्याने चोरली. यामध्ये 6,500 रुपयांची रोकड, सौंदर्यप्रसाधनं आणि व्हीव्हो Y-19 हा मोबाईल होता. याप्रकरणी त्या महिलेचे पती कन्हैय्यालाल मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चोरी केल्यानंतर इंजिनीअर मोबाईल विकण्यासाठी दुकान शोधत होता. ही बातमी खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. यानंतर रेल्वे पोलिसांनी छापा टाकत इंजिनीअरला अटक केली आहे.
हे ही वाचा : शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट नजर, विद्यार्थ्यांना बाहेर पाठवून शिकवणीच्या बहाण्याने बंद दाराआड...
कोण आहे हा इंजिनीअर?
पोलिसांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर इंजिनीअरने चोरीची कबुली दिली. त्याच्या बॅगेतून एक लेडिज पर्स, 9,500 रुपये रोकड, सौंदर्यप्रसाधने आणि सात मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच जनता एक्सप्रेसमध्ये चोरी केल्याची कबुलीही त्याने दिली. योगेश निवास चव्हाण असं या 25 वर्षीय इंजिनीअरचं नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेगी गावचा राहणारा आहे.
ADVERTISEMENT











