मधुचंद्राच्या रात्रीच बायकोच्या पोटात दुखू लागलं; सकाळी नवऱ्यानं गावभर वाटली मिठाई, नेमकं काय घडलं?

bride gives birth on wedding night : मधुचंद्राची रात्र ही नववधू आणि वरासाठी खूप खास असते. मात्र एका नववधूला लग्नाच्या पहिल्या रात्रीच पोटात दुखू लागलं आणि सकाळी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली. पोलिसांचं म्हणणं आहे की, याविषयी कोणतीच तक्रार आलेली नाही.

bride gives birth on wedding night

bride gives birth on wedding night

मुंबई तक

26 Jan 2026 (अपडेटेड: 26 Jan 2026, 11:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या पहिल्या रात्रीच बायकोच्या पोटात दुखू लागलं

point

सकाळी नवऱ्यानं गावभर वाटली मिठाई

bride gives birth on wedding night :मधुचंद्राची रात्र ही नववधू आणि वरासाठी खूप खास असते. मात्र एका नववधूला लग्नाच्या पहिल्या रात्रीच पोटात दुखू लागलं आणि सकाळी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली. पोलिसांचं म्हणणं आहे की, याविषयी कोणतीच तक्रार आलेली नाही.  उत्तरप्रदेशातील रामपूरमधील अजीमनगर भागात ही जगावेगळी घटना घडली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, प्रजासत्ताक दिनी पावसाची सलामी? इथं बसरण्याची शक्यता

काय आहे नेमका प्रकार?

अजीमनगर भागातील कुम्हारिया गावात ही घटना घडली. लग्नाच्या काही तासानंतरच नववधूने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच घरात बाळाचं आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला. या गावातील रुजवान नावाच्या तरुणाचे बहादुरगंज या गावातील तरुणीसोबत लग्न झाले. या दोघांमध्ये आधीच प्रेमसंबंध होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच तरुणीने लग्नासाठी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. यानंतर पोलिस आणि गावकऱ्यांच्या मध्यस्थीने हे लग्न पार पडले होते.

गावात वाटली मिठाई

शनिवारी सायंकाळी या दोघांचं लग्न झालं. त्याच रात्री बारा वाजता अचानकच नववधूच्या पोटात दुखू लागलं. यानंतर डॉक्टरला बोलावण्यात आलं आणि त्यांनी प्राथमिक उपचार केले. यानंतर रविवारी सकाळी घरात चिमुकल्या बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. नववधूने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली. यामुळे रिजवानच्या घराभोवती चांगलीच गर्दी जमा झाली. रिजवानने आपल्या तान्हुल्या मुलीला कुशीत घेऊन संपूर्ण मिठाई वाटली.

हे ही वाचा : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? साताऱ्यातील दुर्गम भागात DRI ची धाड, 55 कोटींचं ड्रग्ज अन् कच्चा माल जप्त

तरुणी लग्नाआधीच गर्भवती

अजीमनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी कारण सिंग यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी केली. लग्नाआधीच दोघांचे प्रेमसंबंध होते आणि तरुणी गर्भवती होती. सध्या आमच्याकडे कोणतीच तक्रार नाही आणि कोणावरही कायदेशीर कारवाई सुरु नाही.

    follow whatsapp