पती कामासाठी बाहेर अन् इथं पत्नीचे शेजाऱ्यासोबत संबंध; पतीला कळताच थेट प्रियकराकडे पाठवलं पण आठवड्याभरातच झाला गेम...

बराच काळ घरापासून दूर असलेला पती काम संपल्यानंतर, आपल्या पत्नीला घरी भेटायला आला पण त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पती रागाच्या भरात नको ते करून बसला.

पतीने आठवड्याभरातच केला गेम

पतीने आठवड्याभरातच केला गेम

मुंबई तक

• 10:03 AM • 25 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पती कामासाठी बाहेर अन् इथं पत्नीचे शेजाऱ्यासोबत संबंध

point

पतीला कळताच पत्नीला थेट तिच्या प्रियकराकडे पाठवलं

point

पण आठवड्याभरातच झाला गेम...

Crime News: कामानिमित्त बराच काळ घरापासून दूर असलेला पती काम संपल्यानंतर, आपल्या पत्नीला घरी भेटायला आला पण त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पती रागाच्या भरात नको ते करून बसला. शनिवारी सकाळच्या सुमारास सोमा रॉय बर्मन नावाच्या 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे आणि तिचा पती श्रीकांत रॉय यानेच तिची निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

शेजारच्या तरुणाशी पत्नीचे अनैतिक संबंध 

केरळमध्ये कार्यरत असलेला श्रीकांत बऱ्याच दिवसांनी आपल्या घरी परतला होता. त्याला त्याच्या पत्नी आणि मुलांकडून खूप प्रेम मिळेल अशी आशा होती, पण  अनुपस्थितीत त्याची पत्नी सोमा हिचे शेजारच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध नाते निर्माण झाल्याचं समजलं. घरी परतल्यावर त्यांच्यातील वाद इतका वाढला की एक आठवड्यापूर्वी, श्रीकांतने रागाच्या भरात सोमाला तिच्या प्रियकराच्या घरी पाठवलं. परंतु, त्याच्या मनात सुडाची भावना होती. 

हे ही वाचा:  मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी, खाली उतरताना प्राध्यापकाच्या पोटात चाकू खुपसला; उपचारादरम्यान मृत्यू

धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या 

शनिवारी सकाळच्या सुमारास, संतापलेला श्रीकांत त्याच्या पत्नीच्या प्रियकराच्या घरी पोहोचला. तिथे सोमाला पाहिल्यानंतर त्याने कसलाही विचार न करता धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीची निर्घृण केल्यानंतर श्रीकांत तिथून पळून गेला नाही तर तो रक्ताने माखलेले हात घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला. तेथे त्याने दिलेल्या जबाबाने पोलिसांनाही धक्का बसला. त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि सरेंडर केलं. 

हे ही वाचा: हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेली अन् कैद्याच्या प्रेमात पडली... जेलमध्ये घडलं भलतंच

आरोपी श्रीकांतने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS)च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही हत्या पूर्वनियोजित होती की रागाच्या भरात करण्यात आली? याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या, या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. 

    follow whatsapp