मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी, खाली उतरताना प्राध्यापकाच्या पोटात चाकू खुपसला; उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई तक

Mumbai Local Train Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, आलोक कुमार सिंह हे मुंबईतील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी कामावरून घरी परतण्यासाठी ते लोकल ट्रेनने प्रवास करत होते. लोकलमधील गर्दीदरम्यान त्यांचा एका सहप्रवाशासोबत किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. वाद नेमका कशावरून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

ADVERTISEMENT

Mumbai Local Train Crime News
Mumbai Local Train Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी,

point

खाली उतरताना प्राध्यापकाच्या पोटात चाकू खुपसला

point

उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Local Train Crime News : मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून मालाड रेल्वे स्थानकात एक गंभीर घटना घडली. शनिवारी सायंकाळी 33 वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्यावर अज्ञात सहप्रवाशाने चाकूने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आलोक कुमार सिंह हे मुंबईतील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी कामावरून घरी परतण्यासाठी ते लोकल ट्रेनने प्रवास करत होते. लोकलमधील गर्दीदरम्यान त्यांचा एका सहप्रवाशासोबत किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. वाद नेमका कशावरून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : जालना : कॉलेजला निघालेल्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून आळंदीला नेलं, अन् थेट लग्नच केलं

सूत्रांच्या माहिती नुसार, दोघांमधील वाद काही काळ सुरू होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांना तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. दरम्यान, लोकल ट्रेन मलाड रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना आलोक हे उतरायच्या तयारीत दरवाज्याजवळ उभे राहिले. याच वेळी आरोपीने अचानक त्यांच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यामुळे ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडाला. आलोक हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. घटनेनंतर आरोपीने चालत्या ट्रेनमधून उडी मारून घटनास्थळावरून पलायन केले. प्रवाशांना काही कळायच्या आतच तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp