आईला न जुमानता विवाहित प्रियकराला भेटत राहिली; प्रियकराने केला विश्वासघात, तरुणीला गमवावा लागला जीव

Gujrat crime news : गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 22 वर्षीय तरुणीने तिचा प्रियकर मोहम्मद आबिद याच्या छळाला आणि विश्वासघाताला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय मोहम्मद आबिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आबिद हा आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला तीन मुलंही आहेत

Gujrat crime news

Gujrat crime news

मुंबई तक

• 04:09 PM • 25 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईला न जुमानता विवाहित प्रियकराला भेटत राहिली

point

प्रियकराने केला विश्वासघात

point

तरुणीला गमवावा लागला जीव

Gujrat crime news : गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 22 वर्षीय तरुणीने तिचा प्रियकर मोहम्मद आबिद याच्या छळाला आणि विश्वासघाताला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय मोहम्मद आबिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आबिद हा आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला तीन मुलंही आहेत. आबिदने तिला फसवून आपल्या प्रेमाच्या  जाळ्यात ओढले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पतीसोबत वाद झाल्याने घर सोडलं, पण दलालांनी रेड लाईट एरियात विकलं, शेवटी गिऱ्हाईकानेच सोडवलं!

लग्नाच्या अमिषाने ओढले जाळ्यात

ही 22 वर्षीय तरुणी मूळ बिहारची आहे. तिच्या आईसोबत ती गुजरातमध्ये रहायची. तिची आई आणि मोहम्मद आबिद हे एकाच ठिकाणी टेलरिंगचे काम करायचे. याच दरम्यान तरुणी आबिदच्या संपर्कात आली. तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आईने तिला समजावून सांगितले तरीही तिने ऐकले नाही. आईच्या विरोधाला न जुमानता तरुणी आबिदला भेटत राहिली. 

आंधळ्या प्रेमासाठी आईलाही जुमानलं नाही

आबिदपासून दूर व्हावं यासाठी आईनं घरही बदललं. मात्र तरुणी प्रेमात आंधळी झाली होती. जेव्हा तरुणीने आबिदवर लग्नासाठी दबाव बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या नात्यात बेबनाव निर्माण होऊ लागला. आबिदचं लग्न झाल्याचं माहिती असूनही ती त्याच्यासोबत राहण्यावर ठाम होती. आईसोबत वाद झाल्याने ती तरुणी दुसऱ्या भाड्याच्या घरात राहू लागली. याठिकाणी आबिद तिला भेटण्यासाठी येत असे. तेव्हा तरुणी लग्नाचा विषय काढायची. मात्र ना तो तिच्याशी लग्नाला तयार होता ना तिने दुसऱ्यासोबत लग्न करावं म्हणून प्रयत्न करत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तरुणीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या.

हे ही वाचा : शिक्षिकेची स्वयंपाकघरात गळा चिरुन हत्या; माजी भाजप प्रवक्ता ताब्यात, सुरुवातीच्या तपासानंतर वेगळाच ट्विस्ट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. आबिदने त्या तरुणाीवर हल्लाही केला. या छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलले. तिने आधी ब्लेडने मनगटावरची नस कापली आणि नंतर फॅनला गळफास लावून घेतला. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. तसंच आबिदवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे.

    follow whatsapp