पतीसोबत वाद झाल्याने घर सोडलं, पण दलालांनी रेड लाईट एरियात विकलं, शेवटी गिऱ्हाईकानेच सोडवलं!

Crime news : नवऱ्यासोबत भांडण होऊन एक महिला रागात घराबाहेर पडली. मात्र ती घरी न परतल्याने नवऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर काही महिने गेले आणि बिहारची ही महिला सापडली पश्चिम बंगालमधील एका रेड लाईट एरियामध्ये. एखाद्या थरारक चित्रपटासारखी वाटावी अशी ही घटना.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:33 PM • 25 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीसोबत वाद झाल्याने घर सोडलं

point

पण दलालांनी रेड लाईट एरियात विकलं

point

शेवटी गिऱ्हाईकानेच सोडवलं!

Crime news : नवऱ्यासोबत भांडण होऊन एक महिला रागात घराबाहेर पडली. मात्र ती घरी न आल्याने नवऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर काही महिने गेले आणि बिहारची ही महिला सापडली पश्चिम बंगालमधील एका रेड लाईट एरियामध्ये. एखाद्या थरारक चित्रपटासारखी वाटावी अशी ही घटना. बिहारच्या पटनामधील मनेर भागात राहणारी ही महिला आहे. एक दिवस नवऱ्यासोबत भांडण झाल्याने ती घराबाहेर पडली. यानंतर पुढं काय घडलं ते जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : परराज्यात मजुरीसाठी गेला, पण इकडं पत्नीचा शेजाऱ्यावर जीव जडला, गावभर चर्चा अन् हत्येने शेवट

महिलेला रेड लाईट एरियात विकलं

नवऱ्यासोबत भांडण होऊन घराबाहेर पडणारी ही महिला काही दलालांच्या तावडीत सापडली. तिला पश्चिम बंगालमध्ये नोकरी देण्याचं खोटं आश्वासन दलालांनी दिलं. मात्र बंगालमध्ये नेऊन तिला एका रेड लाईट एरियात 25 हजारांना विकण्यात आलं. याठिकाणी काही महिने गेल्यानंतर एका ग्राहकाने तिला मदत केली आणि तिच्या नवऱ्यापर्यंत तिचा ठावठिकाणा पोहोचवला.

पोलिसांची छापेमारी

नवऱ्याला सूचना मिळताच ही माहिती त्याने मनेर पोलिस स्टेशनमध्ये दिली. यानंतर मनेर पोलिसांनी बंगाल पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने संबंधित रेड लाईट एरियावर छापा मारला. संबंधित महिलेला सुखरुपपणे नवऱ्याच्या स्वाधीन करण्यात आले आणि वेश्यागृहाच्या संचालकाला अटक करण्यात आली.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले

महिलेने सांगितली हकिकत 

मनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात ही महिला गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही महिला पश्चिम बंगालमध्ये असल्याची सूचना मिळाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. सूचना देणारा ग्राहक आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने छापेमारी करुन महिलेला ताब्यात घेण्यात आलं. सोबतच वेश्यागृहाच्या संचालकालाही अटक करण्यात आलं आहे. महिलेने सांगितले की, 'नवऱ्यासोबत तिचं भांडण झालं होतं. यानंतर एका तरुणाने तिला नोकरीचं अमिष दाखवून पश्चिम बंगालच्या रेड लाईट एरियात विकले.' दरम्यान, तिला सुखरुपपणे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    follow whatsapp