शिक्षिकेची स्वयंपाकघरात गळा चिरुन हत्या; माजी भाजप प्रवक्ता ताब्यात, सुरुवातीच्या तपासानंतर वेगळाच ट्विस्ट

Ambedkarnagar Crime News : एका शिक्षिकेचा तिच्याच घरातील स्वयंपाकघरात दिवसाढवळ्या गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिचा पती जो भाजपचा माजी शहर प्रवक्ता होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही कारणास्तव शिक्षिका शाळेत गेली नव्हती. याचाच फायदा घेत आरोपीने धारदार शस्त्राने तिची हत्या केली.

crime news

crime news

मुंबई तक

• 11:44 AM • 25 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेची स्वयंपाकघरात गळा चिरुन हत्या

point

माजी भाजप प्रवक्ता ताब्यात

Ambedkarnagar Crime News : एका शिक्षिकेचा तिच्याच घरातील स्वयंपाकघरात दिवसाढवळ्या गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिचा पती जो भाजपचा माजी शहर प्रवक्ता होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही कारणास्तव शिक्षिका शाळेत गेली नव्हती. याचाच फायदा घेत आरोपीने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगर येथील अकबरपूर परिसरातील गांधी आश्रम संकुलात 19 जानेवारी रोजी ही घटना घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पती कामासाठी बाहेर अन् इथं पत्नीचे शेजाऱ्यासोबत संबंध; पतीला कळताच थेट प्रियकराकडे पाठवलं पण आठवड्याभरातच झाला गेम...

घरात एकटी असल्याचा घेतला फायदा 

शिक्षिका घरात  एकटीच होती. तिची मुलं शाळेत गेली होती आणि कुटुंबातील इतर सदस्यही घरात उपस्थित नव्हते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिला संपवले. मृत शिक्षिकेचे सासरे गांधी आश्रमात कर्मचारी होते आणि निवृत्तीनंतरही ते त्यांच्या कुटुंबासह त्याच संकुलातील एका निवासस्थानी राहत होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा शिक्षिकेचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. यानंतर कसून तपासणी करण्यात आली आणि शेजाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

सुरुवातीच्या तपासानंतर ट्विस्ट 

सुरुवातीच्या तपासात आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांमुळे या हत्येला एक नवीन वळण आले आहे. असे म्हटले जात आहे की, घरात अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. यावरुनच पोलिसांना तिच्या नवऱ्यावर; जो भाजपचा माजी शहर प्रवक्ताही आहे, संशय बळावला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. 

हे ही वाचा : पतीने मित्रासोबत मिळून रचला भयानक कट, पत्नीसोबत नको ते करून बसला!

माजी भाजप शहर समिती प्रवक्त्याला घेतले ताब्यात

मृत महिलेचा पती भाजप शहर समितीचा माजी प्रवक्ता होता. या घृणास्पद हत्येमागे कौटुंबिक वाद आणि अंतर्गत कलह हे प्राथमिक कारण असल्याचे मानले जात आहे. याविषयी आता पोलिस कसून तपास करत आहेत.

    follow whatsapp