झालं आता कलेक्टर होणार, 8 वी शिकलेल्या रामूने मुलीला गंडवलं, शरीरसुख घेतल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 03:48 PM)

Hapur Crime News : एका आठवी पास तरुणाने आपण युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली असून लवकरच कलेक्टर होणार असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रामबाबू असं या तरुणाचं असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्नॅपचॅटवरुन या दोघांची ओळख झाली होती.

Hapur Crime News

Hapur Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लवकरच कलेक्टर होणार असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार

point

आठवी पास तरुणानं गंडवलं

Hapur Crime News : एका आठवी पास तरुणाने आपण युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली असून लवकरच कलेक्टर होणार असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रामबाबू असं या तरुणाचं असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्नॅपचॅटवरुन या दोघांची ओळख झाली होती. आपण खूप हुशार आणि श्रीमंत असल्याचं भासवून रामबाबूने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पन्नासपर्यंत आकडे न लिहिला आल्याने चार वर्षाच्या मुलीला केलं ठार; संतापलेल्या बापाचं कृत्य, रिमान्डमध्ये घेताच दिली कबुली

'अशी' झाली ओळख

जानेवारी 2025 मध्ये उत्तरप्रदेशातील भदोही इथं राहणाऱ्या रामबाबू उर्फ रामफल गौतम याच्याशी स्नॅपचॅटवर त्या तरुणीची ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेला. या संवादादरम्यान रामबाबूने आपण खूप हुशार असल्याचं भासवलं. तसंच आपण युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली असून लवकरच कलेक्टर होणार असल्याचं त्यानं तरुणीला सांगितलं. यामुळे तर ती तरुणी रामबाबूवर चांगलीच फिदा झाली. मात्र त्या तरुणीला आपण फसवले जात आहोत याविषयी काहीच समजलं नाही.

तरुणीच्या भावाला आला संशय

रामबाबू लवकरच कलेक्टर होणार आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, असं तरुणीनं तिच्या भावासा सांगितलं. ती लग्नासाठी अडूनच राहिली. मात्र भावाला याविषयी संशय वाटत होता. त्याने रामबाबूला त्याची शैक्षणिक कागदपत्रे आणि रिझ्युम मागितला. आता आपलं पितळ उघडं पडणार असं रामबाबूला वाटताच त्याने एक नवा डाव खेळला. 30 डिसेंबर 2025 रोजी त्याने तरुणीला फसवून पळवून नेले आणि लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ज्यावेळी तरुणीच्या भावाने रामबाबूची कागदपत्रे तपासली, तेव्हा त्याला धक्काच बसला. यामध्ये रामबाबू हा फक्त आठवी पास असल्याचं निष्पन्न झालं

हे ही वाचा : एकतर्फी प्रेमात बनला हैवान, नगरसेवकाच्या मुलाने 10 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं... 6 दिवसांनंतर पीडितेचा मृत्यू

अहमदाबाद येथे स्वत:च्या मालकीची कंपनी

कलेक्टर होणार असल्याचं सांगून रामबाबूने तरुणीला फसवलंच, मात्र आपण खूप श्रीमंत असल्याचंही त्याने तरुणीला सांगितलं होतं. गुजरातमधील अहमदाबाद इथं स्वत:च्या मालकीची कंपनी असल्याचं रामबाबूने सांगितलं होतं. मात्र ही माहितीही खोटी निघाली.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सत्य परिस्थिती समजताच त्या मुलीला धक्काच बसला. यानंतर मुलीने हापूर पोलिस स्टेशनमध्ये आपली कैफियत मांडली. यानंतर पोलिस अधिक्षक वरुण मिश्रा यांच्या सूचनेनुसार हापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी विनोद पांडे यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी हापूर न्यायालयाजवळ रामबाबूला अटक केली. आरोपीवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.