Extra Marital Affair: छत्तीसगडमधून विवाहबाह्य संबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका महिलेचे विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध होते. जवळपास तीन महिन्यांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि दोघे मध्य प्रदेशात जाऊन राहू लागले. संबंधित महिलेच्या पतीचं निधन झालं असून ती आपल्या गावात परतली आणि त्यावेळी तिच्यासोबत भयानक घटना घडली. तिच्या प्रियकराच्या कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली आणि संपूर्ण गावात फिरवून तिला अपमानित केलं.
ADVERTISEMENT
हे प्रकरण खोडरी चौकी अंतर्गत येणाऱ्या एका गावातील असल्याची माहिती आहे. येथील रहिवासी असलेल्या एका 35 वर्षीय महिलेच्या पतीचं वर्षाभरापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर, त्या महिलेचे तिच्या गावात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांच्यातील विवाहबाह्य संबंधामुळे जवळपास तीन वर्षांपूर्वी ते घरातून पळून गेले.
हे ही वाचा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे प्रकाश आंबेडकरांचं गणित फिस्कटलं, अकोल्यात NCP च्या पाठिंब्याने भाजप मिळवणार सत्ता...
प्रियकरासोबतच राहायचं असल्याचं महिलेने सांगितलं...
त्यानंतर, दोघे मध्य प्रदेशातील शहडोल येथे राहू लागले. जेव्हा दोघे तीन महिन्यांनंतर आपल्या गावी परतले तेव्हा दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला. महिलेचं कुटुंब आणि तिच्या प्रियकराचं कुटुंब खोडरी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलीस ठाण्यात महिलेने सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे. त्यानंतर, ते सर्व त्यांच्या गावी परतले. त्याच गावातील एका पुरूषाने महिलेला आणि तिच्या प्रियकराला त्याच्या घरी आश्रय दिला होता.
हे ही वाचा: पतीसोबत वाद झाल्याने घर सोडलं, पण दलालांनी रेड लाईट एरियात विकलं, शेवटी गिऱ्हाईकानेच सोडवलं!
या घटनेनंतर, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास महिलेच्या प्रियकराची पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील इतर काहीजण गोळा झाले आणि त्यांनी त्या महिलेला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, तिला पूर्ण गावात फिरवण्यात आलं आणि मारहाण करताना तिला गावाच्या मुख्य रस्त्यावर चालवत अपमानित करण्यात आलं. पीडितेच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी महिलेची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली, तिला कपडे दिले आणि पोलिसांना या घटनेबद्दल कळवलं. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले आणि जखमी महिलेला आपल्या सोबत घेऊन गेले. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल असून घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT











