Crime News : समलैंगिक संबंध हा समाजाने निषिद्ध मानलेला विषय आहे. मात्र असे संबंध आधीपासूनच अस्तित्त्वात आहेत. अशा संबंधातून अनेक गुन्हेही घडतात. अशाच गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 वर्षीय भाचीने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आत्याने भाचीचा गळा दाबून खून केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर या आत्याचे गावातील अनेक महिलांसोबत समलैंगिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या आत्याला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी केली जात आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोट्यावधींचा हुंडा, तरीही चौधरी कुटुंबाची भूक भागेना, वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात; सरपंचाच्या सुनेची आत्महत्या
आत्याचे गावातील अनेक महिलांसोबत समलैंगिक संबंध
समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आसुसलेल्या या आत्याचे नाव काजल असे आहे. तिच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, काजलला पुरुषांप्रमाणे राहायला आवडायचं. पुरुषांप्रमाणेच केस कापून ती सगळीडे हिंडायची. गावातील अनेक महिलांवर दबाव बनवून काजलने त्यांच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते. 16 वर्षीय भाची सोबतही तिला समलैंगिक संबंध ठेवायचे होते. मात्र भाचीने यासाठी नकार दिला. नकार सहन न झाल्याने काजलने आपल्या भाचीचा गळा दाबून खून केला.
पैशांच्या अमिषाने ओढायची जाळ्यात
गावकऱ्यांनी देखील काजलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, गावातील अनेक महिलांसोबत काजलचे समलैंगिक संबंध होते. आर्थिक मदत आणि कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने ती अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि समलैंगिक संबंधांसाठी विवश करायची. मृत मुलीच्या चुलत भावाने आणि गावच्या माजी प्रमुखांनी आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? साताऱ्यातील दुर्गम भागात DRI ची धाड, 55 कोटींचं ड्रग्ज अन् कच्चा माल जप्त
फरार आत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
भाचीची हत्या करताच काजल फरार झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. घटनेनंतर काही तासांतच फरार झालेल्या आत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस काजलची कसून चौकशी करत असून या घटनेच्या विविध बाजू तपासल्या जात आहेत.
ADVERTISEMENT











