कोट्यावधींचा हुंडा, तरीही चौधरी कुटुंबाची भूक भागेना, वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात; सरपंचाच्या सुनेची आत्महत्या

मुंबई तक

Pune Crime News : लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीप्तीला मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी नांदायला गेल्यावर व्यवसाय अडचणीत असल्याचे कारण देत माहेरून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार दीप्तीच्या पालकांनी 10 लाख रुपये दिले. त्यानंतर “लग्नात गाडी दिली नाही” या कारणावरून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कमही रोख स्वरूपात दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोट्यावधी रुपये देऊनही चौधरी कुटुंबाची भूक भागेना

point

वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात, जाचाला कंटाळून दीप्तीची आत्महत्या

Pune Crime News : “आमच्या वंशाला दिवा हवा, मुलगी नको,” असे म्हणत पाच महिन्यांच्या गर्भातील बाळाचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत सुरू झालेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ अखेर एका विवाहितेच्या आत्महत्येने संपला. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सासरच्या चार जणांना अटक 

या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहन कारभारी चौधरी (पती), सुनिता कारभारी चौधरी (सासू – सरपंच, सोरतापवाडी), कारभारी चौधरी (सासरे) आणि रोहित कारभारी चौधरी (दीर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील रहिवासी आहेत. मृत दीप्ती मगर हिची आई सौ. हेमलता बाळासाहेब मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

'तू माझ्या रूपाला साजेशी नाहीस, तुला घरकाम येत नाही'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2019 रोजी दीप्ती मगर हिचा विवाह रोहन चौधरी याच्याशी रीतिरिवाजाप्रमाणे पार पडला. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही लग्नाच्या काही महिन्यांतच पती रोहन याने दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. “तू माझ्या रूपाला साजेशी नाहीस, तुला घरकाम येत नाही,” अशा अपमानास्पद शब्दांत तो दीप्तीचा सातत्याने मानसिक छळ करत होता.

हेही वाचा : बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले? सुषमा अंधारेंनी सगळं सांगितलं VIDEO

हे वाचलं का?

    follow whatsapp